संत तुकाराम अभंग

जातो वाराणसी – संत तुकाराम अभंग – 234

जातो वाराणसी – संत तुकाराम अभंग – 234


जातो वाराणसी ।
निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥
गेलों येतों नाहीं ऐसा ।
सत्य मानावा रे भरवसा ॥ध्रु.॥
नका काढूं माझीं पेवें ।
तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥
भिकारियाचे पाठीं ।
तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥
सांगाल जेवाया ब्राम्हण ।
तरी कापाल माझी मान ॥४॥
वोकलिया वोका ।
म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥
तुम्हीं खावें ताकपाणी ।
जतन करा माझे लोणी ॥६॥
नाहीं माझें मनीं ।
पोरें रांडा नागवणी ॥७॥
तुका म्हणे नष्ट ।
होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥

अर्थ
एखादा मनुष्य काशीस निघाला आणि तो घरच्यांना सांगतो कि माझे गाई घोडे म्हैसी सांभाळा.असे म्हणून तो म्हणतो कि तुम्ही काळजी करू नका मी असा जातो आणि असा येतो काळजी करू नका.अरे माझ्या पेवेतील धान्य खाण्या करिता काढू नका तुम्ही भुसा मिश्रित फोलपट खावे.जर कोणी भिक मागण्या साठी भिकारी दारात आला तर तुम्हीं त्याच्या मागे काठी घेऊन लागा व त्याला हाकलून द्या.तुम्ही जर जेवणा साठी एखादा ब्राम्हण घरी बोलावला तर तुम्हाला माझी मान कापल्याचे पाप लागेल.अरे मला कधी ओकारी आली तरी मी त्याच्या साठी कधी एक रुपयाही खर्च केला नाही.तुम्ही पातळ पाण्या सारखे जे दही ताक आहे ते घ्या पण माझे लोणी जतन करा.माझ्या मनात बायका पोरे या विषयी प्रेमच नाही कारण ते मला लुटणारी आहे.तुकाराम महाराज म्हणतात असा हा माणूस जे मनात येईल ते स्पष्ट बोलतो मग तो जरी बाहेर(काशीस) गेला तरी देवा कडे काय लक्ष असणार?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


जातो वाराणसी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *