संत तुकाराम अभंग

स्त्रियांचा तो संग नको – संत तुकाराम अभंग – 239

स्त्रियांचा तो संग नको – संत तुकाराम अभंग – 239


स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।
काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
नाठवे हा देव न घडे भजन ।
लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें ।
लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु ।
परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥

अर्थ
महाराज म्हणतात देवा मला स्त्रियांचा संग नको आहे मग त्या लाकडी किंवा पाषाण मातीच्या असतील तरी नको.कारण त्यांच्या मुळे देवाचे भजन व देव हि आठवत नाही कारण मन हे त्यांच्या ठिकाणी लांचावलेले असते त्यामुळे ते आवरत नाही.आहो दृष्टीने त्यांच्या कडे पहिले तरी मरण ओढवते व त्यांचे लावण्या हे खरे दुखाचे मुळ आहे.तुकाराम महाराज म्हणतात अग्नी हा उपकरी असला तरी पण त्याच्याशी संबंध आला कि तो आपल्यालाही बाधतो म्हणजे नष्ट करतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


स्त्रियांचा तो संग नको – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *