देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं – संत तुकाराम अभंग – 256
देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं ।
आपुलें जाणती परावें जे ॥१॥
तयासि चालतां पाहिजे सिदोरी ।
दुःख पावे करी असत्य तो ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें ।
छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥
अर्थ
जो देह मीच आहे असे मानतो त्याच्या चित्त लोभ वसलेला असतो आणि जो “हा आपला तो परका” असे मानतो.त्याला या भू लोकात जन्म मृत्यूची वाटचाल करण्या करता पाप पुण्याची शिदोरी बरोबर घ्यावी लागते आणि तो जर सारखा सारखाअधर्मच करत राहिला तर त्याला दुखच प्राप्त होते.तुकाराम महाराज म्हणतात उन्हात तापलेल्या मनुष्याला जसे छाया मिळावी असे वाटते तसे तुम्ही धर्म रक्षण करण्या करता प्रयत्न करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.