विठ्ठला रे तूं उदाराचा राव – संत तुकाराम अभंग – 319
विठ्ठला रे तूं उदाराचा राव ।
विठ्ठला तूं जीव जगाचा या ॥१॥
विठ्ठला रे तूं उदाराची रासी ।
विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥
विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड ।
विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥
विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें ।
विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥३॥
विठ्ठला रे वाचे बोला बहुरस ।
विठ्ठला रे सोस घेतला जीवें ॥४॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका ।
विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥५॥
अर्थ
विठ्ठला तू सर्व जगाचा राजा आहेस आणि जगाला जीवन देणारा जीव आहेस.हे विठ्ठला तुझ्या जवळ सर्व औदार्याची राशी आहे तुझ्याजवळ सर्वप्रकारच्या सिद्धी आहेत.विठ्ठला तुझे हे नाव किती गोड आहे आणि तू भक्तांचे सर्व लाड पुरावितोस.हे विठ्ठला तुझे श्रीमुख अतिशय चांगले आहे सुंदर आहे त्यामुळे मला तुझे ध्यान लागले आहे.विठ्ठला तुझे नाम घेतल्यावर वाणी अशी रसभरीत वाटते माझ्या जीवाने तुझा ध्यास घेतला आहे.विठ्ठला तुला भेटण्या करता मी तुकाराम शोक करीत आहे तेव्हा तू त्वरेने मला भेटण्याकरिता ये.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.