सोलीव जें सुख अतिसुखाहुनि – संत तुकाराम अभंग – 323
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि ।
उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥
वृंदावन सडे चौक रंग माळा ।
नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ ।
मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥२॥
नामओघ मुखीं अमृताचें सार ।
मस्तक पवित्र सहित रजें ॥३॥
तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना ।
नये हा वासना त्याची करी ॥४॥
अर्थ
जे सोलीव सुख म्हणजे आत्यंतिक सुखाचा गाभा आहे तो विठ्ठल वैष्णवांच्या दारामध्ये उभा असतो.वैष्णवांच्या दारातच तुळशीवृंदावन आहे सडा घातलेला आहे रांगोळ्या काढलेल्या आहेत व अशा पवित्र वातावरणातच तो परमात्मा नाचत असतो.वैष्णवांच्या गळ्यात नेहमी तुळशीची माळ असते असते व त्यांच्या अंगावर गंध लावलेले असतात असे ते वैष्णव सुशोभित असतात.वैष्णवांचे मुख म्हणजे नेहमी हरीचे गुणगान गात असतात आणि त्याचे कपाळ हरी चरण धुळीने माखलेले असतात.तुकाराम महाराज म्हणतात आशा वैष्णवांना मोक्ष प्राप्तीची इच्छा नसते तर मोक्षाला त्यांची इच्छा होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.