मुसावले अंग – संत तुकाराम अभंग – 367
मुसावले अंग ।
रंगीं मेळविला रंग ॥१॥
एकीं एक दृढ जालें ।
मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥
सागरीं थेंबुटा ।
पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥
तुका म्हणे नवें ।
नव्हे जाणावें हें देवें ॥३॥
अर्थ
देवा माझे सर्वांग हे ब्रम्हभावाने रंगून गेले आहे कारण माझ्या जीवाचा रंग आत्मत्वा मध्ये मिळवला आहे.जीव आणि शिव हे दोन्ही एकमेकात समरस झाले आहेत.जसे सागरांमध्ये एक थेंब पाणी पडल्यावर ते वेगळे काढता येणार नाही त्याप्रमाणे हे जीव ब्रम्हाशी ऐक्य झाल्यामुळे हे आता वेगळे होणे अशक्य आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे काही नवीन आहे असे तुम्ही समजू नये कारणहे तुम्हाला माहीत आहे की जीव आणि शिव हे दोन्ही मूळचेच ऐक्य रूप आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.