संत तुकाराम अभंग

धणी न पुरे गुण गातां – संत तुकाराम अभंग – 394

धणी न पुरे गुण गातां – संत तुकाराम अभंग – 394


धणी न पुरे गुण गातां ।
रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥
बरवा बरवा पांडुरंग ।
कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥
सकळ मंगळाचें सार।
मुख सिद्धीचें भांडार ॥२॥
तुका म्हणे सुखा ।
अंतपार नाहीं लेखा ॥३॥

अर्थ

तुझी स्तुती करतांना व गुण वर्णन करताना तृप्तीच होत नाही असे म्हणून महाराज सांगत आहेत.हा पांडुरंग खरच फार सुंदर आहे स्वरूपाने सावळा सुंदर आहे.या भगवंताचे रूप सर्व मंगलाचे सारतत्व आहे व सर्व सिद्धीचे भांडार म्हणजे याचे मुखआहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या ठिकाणी जे सुख आहे,त्याची सीमाच नाही व त्याचे वर्णनही करता येणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


धणी न पुरे गुण गातां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *