संत तुकाराम अभंग

भक्तॠणी देव बोलती पुराणें – संत तुकाराम अभंग – 67

भक्तॠणी देव बोलती पुराणें – संत तुकाराम अभंग – 67


भक्तॠणी देव बोलती पुराणें ।
निर्धार वचनें साच करीं ॥१॥
मागें काय जाणों अइकिली वार्ता ।
कबिर सातें जातां घडया वांटी ॥ध्रु.॥
माघारिया धन आणिलें घरासि ।
ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥
नामदेवाचिया घरासि आणिलें ।
तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥
प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण ।
व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥
बीज दळोनियां केली आराधना ।
लागे नारायणा पेरणें तें ॥५॥
तुका म्हणे ऐसा नाहीं ज्या निर्धार ।
नाडेल साचार तोचि एक ॥६॥

अर्थ
देव भक्तांचा ऋणी आहे, भक्तांनी आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकले आहे, असे पुराणाने सांगितलेले आहे .पूर्वीची अशी गोष्ट सांगितली, की संत कबीरांनी विणलेली वस्त्रे बाजारात नेउन वाटली तेव्हा एक माणूस वस्त्रा साठी विणवनी करीत असताना कबीरांनी आपल्या आंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले .तो वस्त्रहीन मनुष्य साक्षात परमेश्वर होता .संत नामदेवांना पण असाच अनुभव अला त्यांचेही धन परमेश्वराने ब्राम्हणाकडून लुटविले .या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत, एकनाथांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठीसुध्दा विठ्ठलाने नाथांच्या घरी पानी भरले, कष्ट केले .शेतात पेरण्यासाठी आलेले बी दळून नाथांचे पणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले .तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठला बद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून पार पडू शकत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


भक्तॠणी देव बोलती पुराणें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *