संत तुकाराम अभंग

भोरप्यानें सोंग पालटिलें वरी – संत तुकाराम अभंग – 69

भोरप्यानें सोंग पालटिलें वरी – संत तुकाराम अभंग – 69


भोरप्यानें सोंग पालटिलें वरी ।
बक ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं ।
देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा ।
भीतरील फांसा कळों नेदी ॥२॥
खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी ।
कापावया नळी तया साठीं ॥३॥
तुका म्हणे तैसा भला मी लोकांत ।
परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥४॥

अर्थ
बहुरूपी वरवर विविध सोंग घेऊन दखवितो अथवा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याचे सोंग करतो .त्या प्रमाणे भक्तीचे ढोंग करणारा टिळा, माळ, मुद्रा लाऊन जगाला फसवित असतो .कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाद्य लावतो, त्या खादयामधील फासा माश्याला समजून येत नाही .खाटिक बकर्‍याला कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो .तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू माझा अव्हेर करू नको; कारण तू दयाळू, प्रेमळ असा तारणहार आहेस .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


भोरप्यानें सोंग पालटिलें वरी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *