संत तुकाराम अभंग

युक्ताहार न लगे – संत तुकाराम अभंग – 71

युक्ताहार न लगे – संत तुकाराम अभंग – 71


युक्ताहार न लगे आणिक साधनें ।
अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देईल भेटी ॥ध्रु.॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार ।
घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणिक उपाव ।
दिसती ते वाव नामेंविण ॥३॥

अर्थ
परमार्थ साधन्यासाठी युक्त्ताहार, साधानांची गरज नाही; कारण परमार्थ थोडक्याश्या कष्टाने साध्य होतो, हे नारायणाने सांगितले आहे .या कलियुगात कीर्तना सारखे दूसरे साधन नाही, त्यामुळे भगवंतची भेट घडते .त्यासाठी प्रपंच्याचा त्याग करून, वनामधे जावुन, भस्म-दंड धारण करण्याची काहीही आवशकता नाही .तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरनाशिवाय इतर कोणतेही उपाय मला दिसत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


युक्ताहार न लगे – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *