sarth tukaram gatha

देह आणि देहसंबंधें – संत तुकाराम अभंग – 727

देह आणि देहसंबंधें – संत तुकाराम अभंग – 727


देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥
येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोह नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥
गृह आणि वित्त स्वदेहा विटावें । इतरा भेटावें श्वापदाझाडां ॥२॥
तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥

अर्थ

देह आणि देह संबंधीचे जे कोणी आहेत त्या सर्वांची निंदा करावी व सर्व प्राणी मात्रांना वंदन करावे.यामुळे “मी व माझे” या भ्रमाचा नाश नक्की होईलच.देह मी आहे असे जो समजतो तो,गर्भवासाच्या चक्रात गुंतून पडतो.घर,धन,जागा,स्वतःला विसरावे व इतर प्राणीमात्र व निसर्गाशी संबंध जोडावा.तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या कुणाच्या मुखातून “मी आणि माझे” असे शब्द येत नाही त्याचेच नाव साधू आहे असे मानावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

देह आणि देहसंबंधें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *