sarth tukaram gatha

जाणपण बरें देवाचे – संत तुकाराम अभंग – 765

जाणपण बरें देवाचे – संत तुकाराम अभंग – 765


जाणपण बरें देवाचे ते शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतीच ॥१॥
देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥
आशंकेची बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरी खेळा समबुद्धी ॥२॥
तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशीं खेळा ठाव झाला ॥३॥

अर्थ

ज्ञानी पण हे देवाच्या जवळ असलेला बरा,आम्ही असेच अज्ञानी बरे आहोत.शाहण्या लोकांपुढे लहान मुळे खेळ खेळतात त्याचे सुख हे त्या शहाण्या माणसांना व त्या मुलांना दोघांनाही होते.शंकेची बाधा हि लडिवाळ मुलांना नसते त्यांचे संपूर्ण लक्ष हे खेळा कडेच असेते.तुकाराम महाराज म्हणतात भक्तांना सर्व दिशा सर्व काळ मोकळ्या असतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

जाणपण बरें देवाचे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *