sarth tukaram gatha

संतांचा महिमा तो – संत तुकाराम अभंग – 818

संतांचा महिमा तो – संत  तुकाराम अभंग – 818


संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥
बहु दुधड जरी जाली म्‍हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळों ॥३॥

अर्थ

संतांचा महिमा समजण्यास फार कठीण आहे शब्दाने त्यांची थोरवी सांगता येणार नाही.कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही उपयोग नाही.म्हैस अथवा गाय हि मोठी चांगली व पुष्कळ दुध देणारी असली तरी ती काय कामधेनु होईल? म्हणूनच आपण स्वतःसंत झालो तरच आपल्याला संतांचा मोठेपणा कळू शकेल


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संतांचा महिमा तो – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *