संत तुकाराम अभंग

आतां उघडीं डोळे – संत तुकाराम अभंग – 86

आतां उघडीं डोळे – संत तुकाराम अभंग – 86


आतां उघडीं डोळे ।
जरी अद्यापि न कळे ।
तरी मातेचिये खोळे ।
दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा निध ।
साधिली ते साधे सिद्ध ।
करूनि प्रबोध ।
संत पार उतरले ॥ध्रु.॥
नाव चंद्रभागे तीरीं ।
उभी पुंडलीकाचे द्वारीं ।
कट धरूनियां करीं ।
उभाउभी पालवी ॥२॥
तुका म्हणे फुकासाठीं ।
पायीं घातली या मिठी ।
होतो उठाउठी ।
लवकरीच उतार ॥३॥

अर्थ
मायामोहाने भ्रमीष्ट झालेल्या जीवा,आता तरी तू डोळे उघड, मातेच्या उदारतुन तू जन्म घेऊन तु फक्त दगड आहेस .हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे त्याचे तू सार्थक करून घे, संतांनी जसा भक्तिचा मार्ग धरला आणि ते भवसागरातून तरले , तसा तू भक्तिमार्ग धरुण नारादेहाचे सार्थक करुन घे .हा भवसागर तरुन जाणारी नाव चंद्रभागेतीरि, पुंडलिकाच्या द्वारी कमरेवर हात ठेऊन उभी आहे, उभ्या उभ्या ती सर्वांना बोलविते आहे .तुकाराम महाराज म्हणतात या नावेला कुठालेही मोल द्यावे लागत नाही, अनन्य भावाने त्याला शरण जाणे, हा एकच उपाय या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


आतां उघडीं डोळे – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *