कांहीं नित्यनेमाविण – संत तुकाराम अभंग – 97
जाला दावेदार ।
भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥
अखंड अशुभ वाणी ।
खरें न बोले स्वप्नीं ।
पापी तयाहुनी ।
नाहीं आणीक दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला ।
भूतीं दया नाहीं ज्याला ।
पाठीं लागे आल्या ।
अतिताचे द्वारेशीं ॥३॥
कांहीं संतांचे पूजन ।
न घडे तीर्थांचें भ्रमण ।
यमाचा आंदण ।
सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं ।
मनुष्यपणा केली हानी ।
देवा विसरूनी ।
गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥
अर्थ
दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल असतो .त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवास भोगत असतात .त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नात सुध्दा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडणार नाही .तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशी आलेल्या अतिथीला हाकलुन देतो .त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या व्यक्ती जन्माला येऊन स्वत:चेच नूकसान करून घेतात; कारण प्रपंच्यात ते रमुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कांहीं नित्यनेमाविण – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.