सार्थ तुकाराम गाथा

असोनि न कीजे अलिप्त अहंकारें – संत तुकाराम अभंग – 1626

असोनि न कीजे अलिप्त अहंकारें – संत तुकाराम अभंग – 1626

असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगीच या भारें कुंथा कुंथी ॥१॥
धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तिहीन ॥ध्रु.॥
भ्रमल्यानें दिसें बांधल्याचे परी । माझें मजवरी वाहोनियां ॥२॥
तुका म्हणे धांव घेतलीसे सोई । आतां पुढें येई लवकरी ॥३॥

अर्थ

आपल्या देहामध्ये आत्मा भिन्न आहे परंतु देहा भिमानामुळे तो वेगळा होत नाही. आणि देहाचे पालन-पोषण करण्यात तो निष्कारण अडकून बसतो त्यामुळे हे हरी तू मला बंधनातून सोडवण्याकरता लवकर धाव घे कारण मी शक्तिहीन झालो आहे. मी देहासक्ती धरली आहे, त्याच्या मोहात गुंतलो त्यामुळे मला बांधल्यासारखे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला बंधनातून तुमच्या वाचून कोणीही सोडवणार नाही असे वाटते त्यामुळे तुम्ही लवकर इकडे या आणि मला बंधनातून सोडवा


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *