आपण काय सादर – संत तुकाराम महाराज अभंग – 1818

आपण काय सादर – संत तुकाराम महाराज अभंग – 1818

आपण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठुर ॥१॥
केलें भक्त तैसें देई । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥
काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकर मांडा ॥२॥
काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥३॥
काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥४॥
तुका म्हणे मधी । आता तोडू भेद बुद्धी ॥५॥

अर्थ

देवा तुम्ही तुमच्या इतर भक्तांच्या उद्धारा बाबतीत किती उत्साही असता परंतु आमच्या बाबतीतच तुम्ही असेही निष्ठुर का आहात ? तु तुझ्या भक्तांच्या हृदयामध्ये जसे तुझे प्रेम दिले आहे त्याच प्रकारचे प्रेम माझ्या हृदयातही तु द्यावे. पंक्तीत बसून कोंडा वाढायचा आणि एकांतात बसून साखर मांडा खायचा हे तुमचे वागणे बरोबर आहे काय? एकीकडे तुमच्या पदरात असलेल्या धनाला तुम्ही गाठ मारायची आणि दुसरीकडे आपण एकच आहोत असे म्हणायचे हे तुमचे वागणे बरोबर आहे काय देवा?जसे तुम्ही भक्तांकडून प्रेम घेता तसेच तुम्हीही भक्तांना प्रेम दिले पाहिजे देवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता यामागे झाले ते झाले परंतु आता यापुढे आपल्या दोघांमधील भेद बुद्धी आपण तोडून टाकू.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.