रामदासांची आरती

समर्थ रामदास स्वामी आरती

समर्थ रामदास स्वामी आरती ऑडिओ आणि विडिओ सहितआरती रामदासा |
भक्त विरक्त ईशा |
उगवला ज्ञानसूर्य ||
उजळोनी प्रकाशा || धृ ||

साक्षात शंकराचा |
अवतार मारुती |
कलिमाजी तेचि झाली |
रामदासाची मूर्ती || १ ||

वीसही दशकांचा |
दासबोध ग्रंथ केला |
जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ ||

ब्रम्हचर्य व्रत ज्याचे |
रामरूप सृष्टी पाहे |
कल्याण तिही लोकी |
समर्थ सद्गुरुपाय || ३ ||
आरती रामदासा ||


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: webdunia

2 thoughts on “समर्थ रामदास स्वामी आरती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *