सार्थ श्रीदुर्गासप्तशती

सार्थ श्रीदुर्गासप्तशती

परमकल्याणकार आणि इष्टफलदायक

|| सार्थ श्रीदुर्गासप्तशती ॥

(पदच्छेदांसहित)

(पाठविधी, पठण-पारायणविषयक मार्गदर्शनपर माहिती, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती प्रत्येक स्तोत्राचा व दुर्गापाठाचा सुलभ मराठी अर्थ, देवीकवच, अर्गलास्तोत्र, कीलक व प्राधानिकादी तीन रहस्ये मूळ पाठाला अनुसरून उपयुक्त स्तोत्रे, उपयुक्त यंत्रे, लोकोपयोगी सिद्ध मंत्र, श्रीदुर्गा अष्टोत्तरशतनामावली, – भगवतीची सुंदर चित्रे आवश्यक तेथे माहितीपूर्ण टिपा आणि आरत्या या सर्वांचा समावेश असलेला देवीउपासनेच्या दृष्टीने सर्वार्थानि उपयुक्त ग्रंथ)


१. मनोगत

देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य | प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य ||

‘श्रीदुर्गासप्तशती’ हा हिंदू धर्मातील एक सर्वमान्य ग्रंथ आहे. भारत भूमीतील देवी उपासकांमध्ये या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रंथात भगवती दुर्गेचा आणि तिच्या विभूर्तीच्या असीम पराक्रमांचा इतिहास वर्णन केलेला आहे. या ग्रंथात गूढ साधन रहस्येही आहेत. या ग्रंथात कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा सुरेख संगम आहे. या त्रिवेणी संगमात स्नान करून अर्थात या ग्रंथाच्या पठण-पारायणरूपी सेवेने आजमेर अनेकांनी आपले कल्याण साधले आहे. या ग्रंथाच्या सेवनाने सकाम भक्त मनोवांछित दुर्लभ वस्तू किंवा स्थिती सहज प्राप्त करतात आणि निष्काम भक्त मोक्ष मिळवून कृतार्थ होतात. हा ग्रंथ भक्तांच्या दृष्टीने साक्षात कल्पतरू आहे. म्हणून जो मनुष्य भगवती जगदंबेला शरण जाऊन तिला अत्यंत प्रिय असलेल्या या स्तोत्रमालेचे अखंड पठण करतो, तो दुर्गेच्या कृपाप्रसादाने सर्व अभीष्ट प्राप्त करून घेतो. या आशीर्वादरूप मंत्रमय ग्रंथाच्या आश्रयाने आजपर्यंत असंख्य आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि प्रेमळ भक्तांनी आपली इष्ट कार्ये साध्य करून घेतली आहेत.

भाविक हो । मनुष्याला भगवतीच्या चरणी विनम्र करून त्याच्या अज्ञानाचे करण्याचे अद्भुत सामर्थ्य ‘श्रीदुर्गासप्तशती’ या ग्रंथात आहे, याला ‘देवीमाहात्म्य’, ‘चंडिपाठ’ अशा अन्य नावांनीही संबोधिले जाते. या ग्रंथाच्या सेवेने आपलेही कल्याण व्हावे या उद्देशाने हा ग्रंथ आम्ही संक्षिप्त पाठविधीसह आपल्यासाठी प्रस्तुत करीत आहोत. या ग्रंथाची प्रचलित परंपरेनुसार व्यवस्थित मांडणी करण्याचा आणि मूळ पाठ शुद्ध ठेवण्याचा विशेषत्त्वाने प्रयत्न केलेला आहे. पाठकांच्या सुविधेसाठी प्रत्येक श्लोकाचा पदच्छेद व सुगम अर्थ दिलेला आहे. शापोद्धाराचे अनेक प्रकारही दिले आहेत.

तसेच आवश्यक तेथे महत्त्वपूर्ण टिपाही दिलेल्या आहेत. सप्तशतीपाठाची देव्याः कवचम्, अर्गलास्तोत्रम्, कीलकम्, प्राधानिकं रहस्यम्, वैकृतिकं रहस्यम् व मूर्तिरहस्यम् ही सहा प्रमुख अंगे आहेत. यांपैकी कवच, अर्गला व कीलक ही पहिली तीन अंगे सप्तशती पाठापूर्वी व नंतरची रहस्यरूपी तीन अंगे सप्तशतीचा पाठ झाल्यावर म्हणावयाची आहेत. या क्रमाने सप्तशतीचा पाठ परंपरागत पद्धतीने संपन्न होतो. पहिल्या तीन अंगापैकी देवीकवच हे देहाच्या रक्षणासाठी उपयुक्त व आवश्यक म्हणून म्हटले जाते, अर्गला स्तोत्र हे या ग्रंथपाठाचे इष्ट फल मिळविण्यासाठी साहाय्यक म्हणून म्हटले जाते, तर कीलक स्तोत्र हे सप्तशती ग्रंथाच्या पाठाचे फल प्राप्त होण्यास काही अडसर असेल तर तो दूर करण्यासाठी म्हटले जाते. प्राधानिक रहस्यात पराशक्ती महालक्ष्मीच्या स्वरूपाचे आणि तिच्या अवतारांचे वर्णन आहे. वैकृतिक रहस्यात प्रकृतीसहित तिच्या विकृतींचे स्वरूप व त्यांच्या पूजनाचे माहात्म्य इत्यादी विषयींचे सविस्तर वर्णन आहे. तर मूर्तिरहस्यात चंडिकेच्या अंगभूत असलेल्या नंदा, रक्तदंतिका आदी देवीमूर्तीचे स्वरूप व त्यांचे माहात्म्य विशद करण्यात आलेले आहे. या तीन रहस्यांत आलेल्या गूढ विषयांचेही स्पष्टीकरण दिलेले आहे.

या व्यतिरिक्त देवीउपासनेच्या दृष्टीने उपयुक्त असा पाठविधी, नवार्णविधी, सप्तशतीन्यास यांचाही समावेश केलेला आहे. तसेच सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र, श्रीदुर्गाष्टोत्तरशतनामस्तोत्र, क्षमा प्रार्थना श्रीदुर्गामानसपूजा देव्यपराध क्षमापनस्तोत्र, सिद्धकुंजिकास्तोत्र, विविध यंत्रे, सप्तशतीतील काही उपयुक्त सिद्ध मंत्र, श्रीदुर्गा अष्टोत्तरशतनामावली इत्यादींचा अंतर्भाव करून हा ग्रंथ अधिकाधिक लोकोपयोगी व सुलभ कसा होईल याकडे विशेषत्वाने लक्ष दिलेले आहे.

सप्तशतीचा पाठ विधीनुसार करणे केव्हाही चांगले, पण भगवती दुर्गेच्या चरणी प्रेमपूर्ण भक्ती असणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे. जगदंबेचे श्रद्धाभक्तिपूर्वक स्मरण करून सप्तशतीचा पाठ करणाऱ्यांना तिच्या कृपाप्रसादाचा फार लवकर लाभ होतो. या ग्रंथाला शुद्ध बनविण्यासाठी आम्ही सर्वार्थानि प्रयत्न केलेला आहे. तथापि काही चुका राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबद्दल क्षमा असावी. या ग्रंथाच्या पठण-पारायणरूपी सेवेने आपणा सर्वांचे कल्याण होवो हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना !

धार्मिक प्रकाशन संस्थेचे चालक-मालक माननीय श्री. रवींद्र पेठे व त्यांचे सुपुत्र श्री. सम्राट पेठे यांनी या पुस्तकाच्या रूपाने मला जगदंबेच्या सेवेची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. अशा प्रकारे भगवती दुर्गेच्या आणि तिच्या परमश्रेष्ठ विभूतींच्या अद्भुतरम्य चरित्रलीलांनी सर्वांना आनंद प्रदान करणारा हा दिव्य ग्रंथ भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, सद्गुरू श्रीगजानन महाराज व नाथसिद्धांच्या परम कृपेने आज फाल्गुन कृष्ण षष्ठी, शके १९३० म्हणजेच ‘एकनाथ षष्ठी’ या मंगल पर्वदिनी सोमवारी लिहून पूर्ण झाला. (इति लेखनसीमा)


सातवा दिवस

नित्याचे पूजन करून दुर्गासप्तशतीच्या अकराव्या आणि बाराव्या अध्यायाचे बाचन करावे.


आठवा दिवस

नित्याचे पूजन करून दुर्गासप्तशतीच्या तेराव्या अध्यायाचे वाचन करावे, उपसंहारः।’ या प्रकरणात दिल्याप्रमाणे विनियोग, न्यास व ध्यानादी क्रिया करून भगवती दुर्गेची मानसपूजा करावी. जपमाळेची पूजा करून तिला प्रार्थना करावी. नवार्णमंत्राचा १०८ किया १००८ संख्येत जप करून तो जप देवीला विधिपूर्वक अर्पण करावा. त्यानंतर पुन्हा करन्यास, हृदयादिन्यास व ध्यान


नववा दिवस

नित्याचे पूजन करून दुर्गासप्तशतीत दिलेल्या ऋग्वेदोक्तं देवीसूक्तम्, तंत्रोक्तं

देवीसूक्तम, प्राधानिकं रहस्यम्, वैकृतिकं रहस्यम् व मूर्तिरहस्यम् या स्तोत्रांचे वाचन करावे. तदनंतर सप्तशतीपाठापूर्वी शापोद्वार मंत्राचा ७ वेळा, • उत्कीलन मंत्राचा २१ वेळा व मृतसंजीवनी मंत्राचा ७ वेळा जप केलेला असल्यास तो आताही करावा. जप पूर्ण झाल्यावर क्षमाप्रार्थना, श्रीदुर्गा मानसपूजा, दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला, देव्यपराधक्षमापनस्तोत्र, सिद्धकुंजिकास्तोत्र, देवीमयी व श्रीदुर्गा अष्टोत्तरशत नामावली यांचे बाचन करावे.

(टीप दुर्गापाठाच्या फलप्राप्तीसाठी प्रचलित परंपरेनुसार उपरोक्त दोन सूक्के, – तीन रहस्ये, देव्यपराधक्षमापन स्तोत्र व सिद्धकुंजिका स्तोत्र यांचे वाचन य शापोद्वारादी मंत्रपाठ आवश्यक आहेत.)

(महत्त्वाची सूचना दुर्गासप्तशती ग्रंथाच्या संदर्भात देवीचे कोणतेही चरित्र अर्धे बाचू नये असे म्हणतात. म्हणून नवरात्रांतील दुसऱ्या दिवशी पहिला अध्याय (प्रथम चरित्र), तिसऱ्या दिवशी अध्याय दोन ते चार (मध्यम चरित्र) असा क्रम ठेवलेला आहे. देवीचे उत्तर चरित्र अध्याय पाच ते तेरा इतके विस्तृत आहे. अन्य पर्याय नसल्यामुळे आणि उपासकांना सोयीचे व्हावे म्हणून चौथ्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत उत्तर चरित्रातील अध्यायांची विभागणी केलेली आहे. नवरात्रांतील नऊ दिवसांत श्रीदुर्गासप्तशतीची तीन पारायणे केल्यास देवीच्या तिन्ही चरित्रांचे अखंड बाचन घडू शकेल. त्यासाठी

उपासकाने प्रथम दिनी या निवेदनात आधी नमूद केलेली पहिल्या व दुसऱ्या ‘दिवसाची आराधना एकत्रित करावी. द्वितीय दिनी या निवेदनात आधी नमूद केलेली तिसऱ्या दिवसाची आराधना करावी. तिसऱ्या दिवशी याच निवेदनात आधी नमूद केलेली चौथ्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंतची आराधना एकत्रित करावी. ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी नवरात्रांतील नऊ दिवसांची उपासना म्हणून उपरोक्त क्रमाने मराठी अर्थाचे वाचन करावे.)


दहावा दिवस

दशमीला सकाळी देवीची उत्तरपूजा करून शास्त्रोक्त रितीने पूजा विसर्जित करावी.

११. आपल्या कुटुंबात त्याच दिवसांत सोयरसुतक आल्यास ज्याला सुतक नसेल त्या व्यक्तीकडून ही उपासना पूर्ण करवून घ्यावी. तिला योग्य ती दक्षिणा व दान द्यावे. याबाबतीत पुरोहिताचा सल्ला घ्यावा आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार योग्य ते करावे.

१२. नवरात्रांतील कन्यापूजन नवरात्र उपासनेत काही ठिकाणी कन्यापूजनाचा प्रघात आहे. अष्टमी किंवा नवमीला कमीतकमी तीन किंवा नऊ कन्यांना घरी आमंत्रित करावे. या कन्या दोन वर्षांपेक्षा लहान व दहा वर्षांपेक्षा मोठ्या नसाव्यात. दोन वर्षांची कन्या ही ‘कुमारी’, तीन वर्षांची ‘त्रिमूर्ती’, चार वर्षांची ‘कल्याणी’, पाच वर्षांची ‘रोहिणी’, सहा वर्षांची ‘कालिका’, सात वर्षांची ‘चंडिका’, आठ वर्षांची ‘शांभवी’, नऊ वर्षांची ‘दुर्गा’ तर दहा वर्षांची कन्या ही ‘सुभद्रा’ म्हणून ओळखली जाते. त्यांना पुढील मंत्रांनी वंदन करावे- १. कुमार्यै नमः। २. त्रिमूर्त्यै नमः। ३. कल्याण्यै नमः ।, ४. रोहिण्यै नमः । ५. कालिकायै नमः । ६. चण्डिकायै नमः । ७. शाम्भव्यै नमः । ८. दुर्गायै नमः । ९. सुभद्रायै नमः ।

निमंत्रित कुमारिकांचे पूजन करून नमस्कार करावा. त्यांना उत्तम भोजन द्यावे. भोजनानंतर त्यांच्या मस्तकावर अक्षता टाकून प्रत्येकीला दक्षिणा द्यावी. आधुनिक काळाला अनुसरून त्यांना शिक्षणास उपयुक्त अशा वस्तू द्याव्यात. कुमारी कन्यांच्या पूजनाने महामाया जगदंबा उपासकावर अतिशय प्रसन्न होते. ती त्याची सर्व इष्ट कार्ये सिद्धीस नेते आणि त्याचे सर्व मनोरथ पुरविते.

– जितेंन्द्रनाथ ठाकूर


॥ श्रीदुर्गायै नमः ॥

५.३ देव्याः कवचम् ।

ॐ अस्य श्रीचण्डीकवचस्य ब्रह्मा ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, चामुण्डा देवता, अङ्गन्यासोक्तमातरो बीजम्, दिग्बन्धदेवतास्तत्त्वम्, श्रीजगदम्बाप्रीत्यर्थे सप्तशतीपाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ।

अर्थ :- ॐ या चंडिकवचाचा (देवीकवचाचा) ब्रह्मा हा ऋषी आहे, – अनुष्टुप हा छंद आहे, चामुंडा ही देवता आहे, अंगन्यासातील मातृदेवता हे बीज आहे आणि दिग्बंधदेवता हे तत्त्व आहे. श्रीजगदंबेप्रीत्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा बिनियोग करावा.


ॐ नमश्चण्डिकायै ।। मार्कण्डेय उवाच ।

ॐ यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम् । यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह ।।१।।

अर्थ :- ॐ चंडिका देवीला नमस्कार असो. मार्कंडेय (ब्रह्मदेवाला) म्हणाले, “ॐ हे पितामह। जे या जगात अत्यंत गूढ आहे, मनुष्यमात्रांचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आजपर्यंत (तुमच्याकडून) अन्य कोणालाही सांगितले गेलेले नाही; असे एखादे (गुह्य) साधन मला सांगा.” (१)


ब्रह्मोवाच ।

अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकम् । देव्यास्तु कवचं पुण्यं तच्छृणुष्व महामुने || २ ||

अर्थ :- ब्रह्मदेव म्हणाले, ‘ब्रह्मन! ‘देवीचे कवच’ हेच अत्यंत पवित्र – सर्व प्राणिमात्रांवर उपकार करणारे आणि परम गोपनीय असे साधन आहे. हे महामुने! ते तू श्रवण कर. (२)


प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ||३||

अर्थ – (देवीकवचात देवीच्या पृथक-पृथक नऊ मूर्ती सांगितल्या आहेत. त्या ‘नवदुर्गांची’ नावे अशी आहेत-) पहिले नाव ‘शैलपुत्री’ आहे. दुसऱ्या मूर्तीचे नाव ‘ब्रह्मचारिणी’ आहे. तिसरे स्वरूप ‘चंद्रघंटा’ नावाने प्रसिद्ध आहे. चौथ्या मूर्तीला ‘कूष्मांडा’ म्हणतात. (३)


पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च । सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ||४||

अर्थ :- पाचव्या दुर्गेचे नाव ‘स्कंदमाता’ आहे. देवीच्या सहाव्या रूपाला ‘कात्यायनी’ म्हणतात. तिचे सातवे स्वरूप ‘कालरात्री’ आणि आठवे ‘महागौरी’ म्हणून ओळखले जाते. (४)


नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ॥५॥

अर्थ नवव्या दुर्गेचे नाव ‘सिद्धिदात्री’ आहे. ही सर्व नावे साक्षात महात्मा वेदानेच सांगितलेली आहेत. (4)


दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाऽऽर्द्रचित्ता ||१७||

दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष-जन्तोः स्वस्थैः स्मृता मतिम् अतीव शुभां ददासि ।

दारिद्र्य-दुःख-भय हारिणि का त्वत् अन्या सर्व-उपकार करणाय सदा-आर्ट-चित्ता ।।१७।। 

अर्थ- हे दुर्गे तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राणिमात्रांचे भय हरण करतेस. जो तुझे स्वस्थ चित्ताने चिंतन करतो त्याला तू अत्यंत कल्याणकारक बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख आणि भय हरण करणाऱ्या हे देवी! सर्वांवर अनुग्रह (उपकार) करण्यासाठी जिचे चित्त (अंतःकरण) दयेने नेहमीच आर्द्र असते, अशी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे ? (१७)


एभिर्हतैर्जगदुपैति सुखं तथैते कुर्वन्तु नाम नरकाय चिराय पापम् । संग्राममृत्युमधिगम्य दिवं प्रयान्तु मत्वेति नूनमहितान् विनिहंसि देवि ।।१८।।

एभिः हतैः जगत् उपैति सुखं तथा एते कुर्वन्तु नाम नरकाय चिराय पापम् ।

संग्राम – मृत्युम् अधिगम्य दिवं प्रयान्तु मत्वा इति नूनम् अहितान् विनिहंसि देवि ।।१८।।

अर्थ- हे देवी! या असुरांना मारल्यामुळे जग सुखी होते हे खरे. पण चिरकाल नरकात राहण्यासाठी त्यांनी कितीही पापे केलेली असली तरी रणांगणात (तुझ्या हातून) मरण प्राप्त होऊन ते स्वर्गात जावोत असा विचार करूनच तू शत्रूंना बीरगती (अर्थात सद्रती) देतेस. (१८)


दृष्ट्वैव किं न भवती प्रकरोति भस्म सर्वासुरानरिषु यत्प्रहिणोषि शस्त्रम्। लोकान् प्रयान्तु रिपवोऽपि शस्त्रपूता इत्थं मतिर्भवति तेष्वपि तेऽतिसाध्वी ।।१९।।

दृष्ट्वा एव किं न भवती प्रकरोति भस्म सर्व असुरान्-अरिषु यत् प्रहिणोषि शस्त्रम् ।

लोकान् प्रयान्तु रिपवः अपि शस्त्रपूताः इत्थं मतिः भवति तेषु अपि ते अतिसाध्वी ।।१९।।

अर्थ :-(हे देवी!) तू या असुरांवर शस्त्रांनी प्रहार का करतेस? त्यांना आपल्या दृष्टीनेच भस्मसात का करीत नाहीस? कारण ते जरी शत्रू असले तरी आपल्या शस्त्राने पुनीत होऊन (स्वर्गादी) उत्तम लोकी जावेत अशीच तुझी त्यांच्याविषयी अनुकंपा (सद्भावना) असते. (१९)


खड्गप्रभाकिरविस्फुरणैस्तथोग्रैः शूलाग्रकान्तिनिवहेन दृशोऽसुराणाम् ।

यन्नागता विलयमंशुमदिन्दुखण्ड योग्याननं तव विलोकयतां तदेतत् ||२०||

खड्ग-प्रभा-निकर- विस्फुरणैः तथा उप्रैः शूल- अग्रकान्ति निवहेन दृशः असुराणाम्।

यत् न आगता विलयम् अंशुमत् इन्दुखण्ड योग्य आननं तव विलोकयतां तत् एतत् ||२०||

अर्थ (हे देवी!) तुझ्या खड्गाच्या तेजःपुंज प्रखर दीप्तीने आणि – तुझ्या त्रिशूलाच्या अग्रावर एकवटलेल्या महान तेजामुळे (तुझ्याशी युद्ध

अर्थ तेव्हा तो दैत्याधिपती (आपल्या हाती) खड्ग ब – शतचंद्रचिन्हांकित तेजस्वी ढाल घेऊन देवीवर धावला. (१६)


तस्यापतत एवाशु खड्गं चिच्छेद चण्डिका । धनुर्मुक्तैः शितैर्बाणैश्चर्म चार्ककरामलम् ।।१७।।

तस्यः अपतत् एव आशु खड्गं चिच्छेद चण्डिका । धनुः मुक्तैः शितैः वाणैः चर्म च अर्ककर अमलम् ।।१७।।

अर्थ:-  (पण) तो चाल करून येत असतानाच चंडिकेने आपल्या धनुष्यातून सोडलेल्या तीक्ष्ण बाणांनी त्याच्या खड्गाचे व सूर्यकिरणांप्रमाणे तळपणाऱ्या तेजस्वी ढालीचे तत्काळ तुकडे-तुकडे केले. (१७)


हताश्वः स तदा दैत्यश्छिन्नधन्वा विसारथिः । जग्राह मुद्गरं घोरमम्बिकानिधनोद्यतः ।।१८।।

हत अश्वः सः तदा दैत्यः छिनधन्वा विसारथिः । जग्राह मुद्गरं घोरम् अम्बिका-निध-उद्यतः ।।१८।।

अर्थ:- (मग अश्व आणि सारथ्यासह त्याचा रथही भुईसपाट केला.) तेव्हा धनुष्य, अश्व आणि सारथीहीन अशा त्या दैत्याने अंबिकेचा बध करण्यासाठी हाती भयंकर मुद्गल घेतला. (१८)


चिच्छेदापततस्तस्य मुद्गरं निशितैः शरैः । तथापि सोऽभ्यधावत्तां मुष्टिमुद्यम्य वेगवान् ||१९||

चिच्छेद अपतत् तस्य मुद्गरं शरैः। तथा अपि सः अभि-अधावत् तां मुष्टिम् उद्यम्य वेगवान् ॥ १९ ॥

अर्थ:- पण त्या मुद्गलाचा आघात होण्याआधीच देवीने तीक्ष्ण – बाणांनी त्याचा चुराडा केला. तेव्हा तो मूठ उगारून मोठ्या वेगाने तिला मारण्यासाठी धावला. (१९)


स मुष्टिं पातयामास हृदये दैत्यपुङ्गवः । देव्यास्तं चापि सा देवी तलेनोरस्यताडयत् ||२०||

सः मुष्टिं पातयामास हृदये दैत्यपुंगवः । देव्याः तं च अपि सा देवी तलेन उरसि अताहयत् ।।२०।।

अर्थ त्या दैत्यश्रेष्ठाने देवीच्या छातीवर मुष्टिप्रहार केला. तेव्हा देवीनेही त्याच्या छातीवर हाताने फटका मारला. (२०)


तलप्रहाराभिहतो निपपात महीतले ।स दैत्यराजः सहसा पुनरेव तथोत्थितः ||२१||

तल-प्रहार अभिहतः निपपात महीतले। सः दैत्यराजः सहसा पुनः एव तथा उत्थितः॥२१॥

अर्थ:- तिच्या तळहाताच्या थपडीने तो दैत्यराज जमिनीवर कोसळला, पण लगबगीने पुन्हा उठला. (२१)


उत्पत्य च प्रगृह्योच्चैर्देवीं गगनमास्थितः । तत्रापि सा निराधारा युयुधे तेन चण्डिका ||२२||

उत्पत्य च प्रगृह्य उचैः देवीं गगनं आस्थितः । तत्र अपि सा निराधारा युयुधे तेन चण्डिका ॥२२॥

अर्थ:- त्याने देवीला उचलून आकाशात उंच उड्डाण केले आणि तेथेच – थांबला, पण चंडिका अधांतरी राहूनही त्याच्याशी लढू लागली. (२२)


ऋग्वेदोक्तं देवीसूक्तम्।

ॐ अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुत विश्वदेवैः । अहं मित्रावरुणोभा बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्विनोभा ॥१॥

अर्थ:- (बाक्’ ही महर्षी अम्भृणांची कन्या म्हणून या सूतारंभी विनियोगामध्ये तिचा ‘बागाम्भृणी’ (ऋषी) असा उल्लेख करण्यात आलेला आहे. ती ब्रह्मज्ञानी व देवीशी एकरूप झालेली होती. पुढील उद्गार तिचेच आहेत. ती म्हणते-) “ॐ मी (सच्चिदानंदस्वरूपिणी व सर्वात्मक देवता असून) (एकादश) रुद्र (अष्ट) बसू, (द्वादश) आदित्य व (समस्त) विश्वेदेवांच्या रूपांत संचार करते. मीच मित्र व अरुण, इंद्र, अग्नी आणि दोन्ही अश्विनीकुमारांना धारण करते. (१)


अहं सोममाहनसं बिभर्म्यहं त्वष्टारमुत पूषणं भगम् । अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते ||२||

अर्थ:- शत्रूंचा नाश करणारा आकाशस्थित सोम त्वष्टा प्रजापती, तसेच पूषा व भग यांनाही मीच धारण करते. त्याचप्रमाणे उत्तम हचिद्रव्यांनी व सोमरसाने देवांना तृप्त करणाऱ्या (अर्थात संतुष्ट ठेवणाऱ्या) यजमानाला मीच उत्तम यज्ञाचे फल व धन प्रदान करते. (२)


अहं राष्ट्री संगमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् । तां मा देवा व्यदधुः पुरुत्रा भूरिस्थात्रां भूर्य्यावेशयन्तीम् ।।३।।

अर्थ:- मी संपूर्ण जगाची स्वामिनी, आपल्या उपासकांना धन प्राप्त – करून देणारी, साक्षात्कार करून घेण्यास योग्य अशा परब्रह्माला आपल्याहून अभिन्न रूपात जाणणारी (अर्थात परब्रह्माशी एकरूप अशी ) आणि (विश्वातील समस्त) पूजनीय देवतांमध्ये प्रधान (प्रमुख) आहे. मी प्रपंचरूपाने अनेक भावांमध्ये स्थित आहे. सर्व भूतमात्रांमध्ये मीच (जीवरूपाने) प्रविष्ट होते. अनेक स्थानी राहणाऱ्या देवता जे काही कार्य करतात ते सर्व माझ्यासाठीच केलेले असते. (३)


मया सो अन्नमत्ति यो विपश्यति यः प्राणिति य ई शृणोत्युक्तम् । अमन्तवो मां त उप क्षियन्ति श्रुधि श्रुत श्रद्धिवं ते वदामि ॥४॥

अर्थ:- (मी भोक्तृशक्ती असल्यामुळे या जगात) जो कोणी अन्न भक्षण करतो, पाहतो, श्वास घेतो, ऐकतो, तो ही सर्व कर्मे माझ्याच साह्याने करतो. जे माझ्या स्वरूपाला (सत्यार्थानि) जाणत नाहीत ते हीन दीन होतात. हे बहुश्रुता मी तुला श्रद्धेनेच प्राप्त होणाऱ्या ब्रह्मतत्त्वाचा उपदेशकरते, ऐक (४)


अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवेभिरुत मानुषेभिः । यं कामये तं तमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तमृषिं तं सुमेधाम् ।।५।।

अर्थ:- जे देवांनी आणि मानवांनी (अनन्य भावाने) सेवन केले तेच हे दुर्लभ तत्त्व (ब्रह्मज्ञान) मी स्वतः वर्णन करून सांगते. जो मला आपलासा वाटतो त्यालाच मी प्रगल्भ ब्रह्मज्ञानी, त्रिकालदर्शी व उत्तम प्रज्ञावान बनवते. (५)


अहं रुद्राय धनुरा तनोमि ब्रह्मद्विषे शरवे हन्तवा उ । अहं जनाय समदं कृणोम्यहं द्यावापृथिवी आ विवेश ||६||

अर्थ:- मीच ब्रह्मद्वेषी हिंसक असुरांचा वध करण्यासाठी रुद्राचे धनुष्य – सज्ज करते, मीच शरणागत जनांच्या रक्षणासाठी शत्रूंशी युद्ध करते आणि मीच अंतर्यामिरूपाने पृथ्वी आणि आकाशात व्याप्त होऊन राहते. (६)


सार्थ श्रीदुर्गासप्तशती माहिती समाप्त .

2 thoughts on “सार्थ श्रीदुर्गासप्तशती”

  1. गजानन दामले

    फारच सुंदर सहजच सापडले .रोज दोन तीन मंत्र अनुभविण्याचा मानस आहे. ओम नम: चंडीकाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *