sravana

व्रतांचा व सणांचा राजा श्रावण

श्रावण (sravana) महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. आणि चातुर्मासातील पहिला आणि महत्त्वाचा महिना. या महिन्याची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. मुख्यत्वे करून शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रावणआणि शिवाचे महत्त्व भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये विशेष आहे. अनेक गोष्टी या शिवमय झालेल्या दिसतात. आपले जीवन दुसऱ्यांसाठी समर्पित करणे हेच शिवदर्शन होय.

 

 

 

 

 

सुंदरता, मधुरता, नवचैतन्य, उत्साह आपल्या अंतर्मनात समाविष्ट करता आला, तर आजीवन कोणाबद्दलही आपण इर्ष्या बाळगणार नाही. या महिन्याची महती समजणे हे शिवाचे प्रतीक ओळखण्याइतके सोपे आहे. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वती देवीने या महिन्यातच कठोर तप केले होते. हे तप म्हणजे आपले प्रेम मिळवण्यासाठी केलेला संघर्ष होय. याचाच दुसरा अर्थ म्हणजे शिवप्राप्ती होण्यासाठी आपले मन धुतल्या तांदळासारखे स्वच्छ, निखळ आणि पारदर्शक असणे आवश्यक मानले जाते. षडविकार, दुर्गुण याचा त्याग करून प्रामाणिकपणे, निष्ठेने, अत्यंत श्रद्धा भावनेने, त्याग आणि समर्पित वृत्तीने शिवाची आराधना, उपासना, नामस्मरण करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

पार्वती देवीप्रमाणे आपले हृदय पवित्र, निर्मळ असले पाहिजे. असे मन घडवण्यासाठी कठोर साधना हाच उत्तम मार्ग आहे. या महिन्यात तप करणे अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. कारण हा सृष्टीच्या सृजनोत्सवाचा काळ मानला गेला आहे.यामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे.

या महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते.या महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे.

या महिन्यातील व्रते

व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे . 

सोमवार– शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

मंगळवार-नवविवाहित स्त्रिया दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात.

बुधवार– बुधाची पूजा

गुरुवार– बृहस्पती पूजा

शुक्रवार – जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.

शनिवार– ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन

रविवार– आदित्य राणूबाई पूजन

सत्यनारायण पूजा – या महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे.

दान – हा महिना चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात. देवस्थानांतही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.

या महिन्यातील सण

  • शुद्ध पंचमी- नागपंचमी
  • पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा
  • वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती/’कृष्ण जन्माष्टमी’
  • पिठोरी अमावास्या/दर्भग्रहणी अमावास्या- पोळा

سكس


http://krushikranti.com

श्रावण महिन्याचे महत्व – sravana masam – sravana nakshatra – sravana sukravaram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *