भांबावोनी प्राणी संसारी गुंतले – संत बंका अभंग
भांबावोनी प्राणी संसारी गुंतले ।
माझें म्हणोनि श्रमले भवनदी ॥१॥
नामाची सांगडी न बांधिती कोणी ।
चौर्यांशीची खाणी भोगताती ॥२॥
आपुला आपण झाला असे वैरी ।
हिंडे दारोदारी भिक मागा ॥३॥
वंका म्हणे नाम सांडोनी विठ्ठल ।
वाचे बोलती बोल वाउगची ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.