संत भानुदास अभंग

धन्य धन्य हें नगर – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३१

धन्य धन्य हें नगर – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्यग – ३१


धन्य धन्य हें नगर ।
भुवैकुंठ पंढरपूर ॥१॥
धन्य धन्य चंद्रभागा ।
मध्यें पुंडलिक उभा ॥२॥
धन्य धन्य वेणुनाद ।
क्रीडा करितो गोविंद ॥३॥
धन्य पद्माळ्यांची पाळी ।
गाई चारी वनमाळी ॥४॥
धन्य पंढरीचा वास ।
देवा गाये भानुदास ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्य धन्य हें नगर – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *