संत भानुदास अभंग

साधनाच्या आटी नको – संत भानुदास अभंग मुमुक्षूसबोध – ५४

साधनाच्या आटी नको – संत भानुदास अभंग मुमुक्षूसबोध – ५४

साधनाच्या आटी नको रे कपाटीं ।
पंढरी वैकुंठ पाहें डोळां ॥१॥
मंत्राचा आटी पडशील व्यसनीं ।
पंढरी जाउनी पाहे डोळां ॥२॥
तपाचिया आटी पडशी डोंगरीं ।
पाहें पां पंढरी डोळेभरी ॥३॥
यज्ञाच्या आटी फिरुं नको देशा ।
पंढरीनिवास पाहे डॊळां ॥४॥
भानुदास म्हणे नामाचा हव्यास ।
पंढरी सुखास पात्र होशी ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

साधनाच्या आटी नको – संत भानुदास अभंग मुमुक्षूसबोध – ५४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *