संत चोखामेळा अभंग

आजि सोनियाचा दिवस – संत चोखामेळा अभंग – १८६

आजि सोनियाचा दिवस  – संत चोखामेळा अभंग – १८६


आजि सोनियाचा दिवस धन्य झाला ।
प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥
माझें मज दिलें माझें मज दिलें ।
माझें मज दिलें प्रेमसुख ॥२॥
बहुत आटणी करितां दाटणी ।
सुखाचें सुख मनीं कोंदाटलें ॥३॥
माझा मज देव दावियेला देहीं ।
मी तूं पण गेलें ठाय़ींच्या ठायीं ॥४॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसावा ।
पोकरितों धांवा नामदेवा ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजि सोनियाचा दिवस  – संत चोखामेळा अभंग – १८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *