संत चोखामेळा अभंग

नामाचें सामर्थ्य विष – संत चोखामेळा अभंग – २४०

नामाचें सामर्थ्य विष – संत चोखामेळा अभंग – २४०

नामाचें सामर्थ्य विष तें अमृत ।
ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्‌ठल विठ्‌ठल ।
नको काळ वेळ जपे आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन ।
सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा ।
येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामाचें सामर्थ्य विष – संत चोखामेळा अभंग – २४०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *