संत चोखामेळा अभंग

आम्हां आनंद झाला – संत चोखामेळा अभंग – २६५

आम्हां आनंद झाला – संत चोखामेळा अभंग – २६५


आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला ।
देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें उडालें पाहणें लपालें ।
देवें नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें ।
ह्र्दयींच भेटे देहीं देव ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी ।
उभा भीमातीरीं विटेवरीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्हां आनंद झाला – संत चोखामेळा अभंग – २६५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *