अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥ अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥ चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.