ह.भ.प ओम ब्रह्मचैतन्य उदयनाथजी महाराज

ह.भ.प ओम ब्रह्मचैतन्य उदयनाथजी महाराज

ह.भ.प ओम ब्रह्मचैतन्य उदयनाथजी महाराज


मो : 9819370325

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : ओम ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज महायोग आश्रम, मु. पो. असवली, ता. पारगाव खंडाळा, जि. सातारा.

*।। ॐ ब्रह्मचैतन्य उदयनाथाय नमः ॐ।।*

*सद्गुरूश्रीं चा अल्प परिचय*

सद्गुरू ॐ ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज हे वर्तमान युगातील एक युवादृष्ठा, परमशिव अवस्थेतील एक रहस्यदर्शी पुरुष आहेत.

तसे पाहता, धर्म, अध्यात्म, आणि साधना हे तीन तत्व त्यांच्या जीवनाचा मुख्य प्रवाह आहे. परंतु समाजव्यवस्था, राजनीती, आणि आधुनिक विज्ञान या विषयातही त्यांची विशाल प्रज्ञा वाखाणण्याजोगी आहे.

त्यांच्या प्रवचन आणि मार्गदर्शनरुपी उपदेश वाणीतून जो ज्ञान आणि बोध समाजास मिळतो तो जीवनातील अत्यंत गूढ आणि अनुभूती मधून आलेला असतो.

एक पूर्ण विकसित महायोगी, संत आणि महाऋषी पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला त्यांच्या दर्शनाने होते.

11 सप्टेंबर 1979 मध्ये मुंबईमहानगरात त्यांचा जन्म झाला. बाल्यावस्थेपासूनच  त्यांची प्रतिमा चंद्रकलेप्रमाणे विकसित होत होती. वयाच्या सहाव्या वर्षी मानवाला महामानव बनवणाऱ्या ध्यानरुपी क्रियेची त्यांना अंतरप्रेरणा झाली. बालपणापासूनच ते मौन आणि एकांतात राहून ध्यानाच्या क्रियेत लिन राहू लागले. अशा प्रकारे अंतर्मुखता आणि अंतर्यामीच्या प्रवासास त्यांनी बालपणापासूनच सुरवात केली. एका साधकाच्या नात्याने त्यांनी आपल्या जीवनास सुरवात केली. त्यांची ध्यान-योगसाधना पुढे वाढू लागली आणि याच काळात विद्यार्थीदशेत एक बुद्धिमान, प्रतिभावंत विद्यार्थी म्हणून ओळखले जाऊ लागले. याच काळात त्यांना ध्यानसाधनेत प्रथम उन्मनी अवस्थेची अनूभूती झाली. या अवस्थेला प्राप्त झाल्यावर त्यांच्या मनात सांसारिक आणि अन्य विषयांबाबत वैराग्यभाव निर्माण झाला. या उन्मणी अवस्थेच्या प्राप्ती वेळी त्यांचे वय केवळ 11 वर्षांचे होते. आणि या अवस्थेमुळे त्यांच्या मनात आत्मसाक्षात्काराची ओढ निर्माण झाली. त्यांना पुढील योगसाधना मार्गात गुरूदेव दत्तप्रभूं मार्गदर्शक लाभले. या साधनेच्या वाटेवर त्यांनी दत्त प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली हठयोग, मंत्रयोग, आणि लययोग आदी योगांच्या विभिन्न अंगांचे ध्यान आणि साधनांच्या प्रक्रियेने यात सिद्धता मिळवली. परत वयाच्या 14 व्या वर्षी त्यांच्या जीवनात दुसऱ्यांदा उन्मणी अवस्थेचा अनुभव आला. पुढे 42 दिवस ते या अवस्थेत होते. साधनेच्या या योग्यतेवर येण्यास त्यांचा साधनेतील आत्मप्रेरणा आणि साधने सातत्य हाच मूलमंत्र होता.

याच काळात त्यांचे व्यावहारिक शालेय शिक्षण पण सुरू होते आणि शाळेत ते एक प्रतिभावंत विद्यार्थी म्हणून गणले जाते होते.

वयाच्या 15 व्या वर्षी ते मुंबई वरून गावाला म्हणजे असवलीला आले. गावापासून 2 कि. मी. अंतरावर त्यांनी आपल्या ध्यानसाधनेसाठी योग्य जागा निवडली आणि याच जागेत त्यांनी पुढील ध्यानसाधनेच्या अभ्यासाला प्रारंभ केला. या वेळी त्यांनी हठयोगातील अत्यंत कठीण समजला जाणारी पंचाग्नीतप साधना अखंड 5 दिवस केली.अशा प्रकारे त्यांची आत्मसाक्षात्कारकडे प्रगती अत्यंत तीव्रतेने झाली. पुढील 70 दिवसांच्या योगसाधनेतून त्यांना परमात्म्याचा अनुभव करून देणारी समाधी अवस्थेतील स्थितीत ते आले, आणि सद्गुरूश्री या समाधी अवस्थेत निरंतर 18 तास होते.याच समाधी अवस्थेत त्यांना परमशिव परब्रह्म परमात्माचे प्रत्यक्ष दर्शन झाले. आणि त्याच पंचमुखी परमशिवास त्यांनी आपले सद्गुरू म्हणून स्वीकारले.

याच वेळी पंचमुखी परमशिव आदिनाथानी त्यांना “तत्वमसी” म्हणजे तू माझेच तत्व आहेस किंवा तू देखील तेच परम तत्व आहेस असा आशीर्वाद व आत्मबोध करवून दिला.

सद्गुरुंचा आपल्या वयाच्या सहाव्या वर्षी सुरू केलेला साधनेचा हा प्रवास वयाच्या 15 व्या वर्षी माघ शुद्ध द्वितीय (धर्मनाथ बीज) या दिवशी ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण झाला.

ज्या ठिकाणी त्यांना आत्मसाक्षात्कार वा ब्रह्मसाक्षात्कार झाला त्याच ठिकाणी आज महायोग मुक्तीपीठ आश्रमाची स्थापना झाली आहे. अशा प्रकारे  सद्गुरुंच्या जीवनात ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी आपल्या आचरण आणि वाणीच्या माध्यमातून समस्त मानवजातीस आत्मजागृती आणि धर्माच्या साधनेस प्रेरणा देण्यास कार्य सुरू केले आहे.

गुरुपीठावर गुरुपूर्णिमा, धर्मनाथबीज, महाशिवरात्री, दत्तजयंती असे अनेक वार्षिक उत्सव आणि प्रत्येक महिन्याच्या पूर्णिमेस मासिक उत्सव म्हणजे भक्तांच्या वारीचा दिवस असतो. या उत्सवात अनेक भक्त सहभागी होतात.

आश्रमावर उत्सवादरम्यान होणारे प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

सकाळी जप, ध्यान आणि पारायण सेवा असते, त्या नंतर सद्गुरुदेवांचे सात्विक आणि पवित्र वाणीतून आलेले प्रवचन असते त्यानंतर भगवान योगेश्वर महादेवांचा पालखी सोहळा असतो. हि पालखी म्हणजे योगेश्वर महादेव हे साक्षात पालखीत विराजमान असतात. त्यात भक्त कसा बेधुंद होतो नाम गजरात रंगून जातो हे प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यालाच समजते इतरांना शब्दांत कळणं कठीण आहेत. असा भक्त हा एका वेगळ्या रंगात रंगून जातो.

तो रंग म्हणजे भक्तीरंग. त्या पालखी सोहळ्याचा नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी जणु अन्नपूर्णा देवीच आपल्या भक्तांना प्रसाद वाटप करतात.

त्यानंतर सद्गुरूदेवांचे दर्शन असते. ते म्हणजे जणु परमेश्वराचे दर्शन असा तो अनुभव असतो. त्या नंतर मग भक्तांची समस्या निवारण करण्याचा कार्यक्रम असतो. भक्तांच्या समस्या चे सद्गुरुदेव अनेक प्रकाराने निवारण करतात कारण सद्गुरू देव हे चौदा विद्या आणि चौसष्ट कालाचे अधिपती आणी सकळ सिद्धिंचे स्वामी आहेत. त्यामुळे भक्त येताना आपले दुःख घेऊन येत असला तरी जाताना आपले दुःख दूर झाल्याचा अनुभव घेऊन जातो.अशा प्रकारे पौर्णिमेच्या वारीने या कार्यक्रमाची सांगता होते.

सद्गुरूंनी भावार्थ श्रीगुरुगीता, अमृत तुषार असे ग्रंथ निर्माण केले आहेत.तर सद्गुरुंची भक्ती वाढावी यासाठी गुरूपाठ, गुरू आराधना याची निर्मिती झाली आहे.या ग्रंथांच्या पारायण सेवेतून भक्तांना आत्मिक आणि पारमार्थिक अनुभव येत असतात.

आश्रमावर योगेश्वर महादेवाचे मुख्य मंदिर असून, , कालभैरवमंदिर, शाबरीमाता व महाकाली सहितअष्टमातृका, धुनिमंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, गुरुमंदिर,नंदीमंदिर असे तीर्थक्षेत्र निर्माण केली आहेत. गुरुमंदिर हे क्षेत्र शिवकैलास आहे. येथे येणारी प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्याच आत्मनंदात न्हाऊन निघते.

तुम्हाला देव पहायचा आहे का ?  तो कसा असतो हे जाणून घ्यायचे आहे का ? तर मग खरच तुम्हाला

तो अनुभव ॐ ब्रम्हचैतन्य उदयनाथ महाराज यांना पहिल्यावर नक्कीच येईल आणि त्यांच्या रूपात तुम्हाला देव दिसेल असा अनेकांचा अनुभव आहे.तो अनुभव तुम्हाला पण येणार यात तिळमात्र शंका नाही.

आपला महायोग आश्रम एक मोठे तीर्थ आहे शिव कैलास आहे.

आपण अनन्य भावे सद्गुरुदेवानां शरण जा आणि आपल्या जीवनाचे सार्थक रा.

*??गुरू ॐ तत सत??*

*॥ ॐ ब्रह्म चैतन्य उदयनाथ महाराज की जय॥*???

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *