कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प. तुळशीराम महाराज गुट्टे

ह.भ.प. तुळशीराम महाराज गुट्टे

पत्ता :- १० ब/१ गंगोत्री विहार, अमृतधाम, पंचवटी, नाशिक

सेवा :- कीर्तनकार, प्रवचनकार

मो. नं :- 9503667355

आध्यात्मिक शिक्षण :- महाराजांनी ‘संत मुक्ताबाई’ जीवनावर संशोधनपर अभ्यासक्रम (पी.एच.डी.) पूर्ण आणि संत साहित्याचे अभ्यासक अशी ओळख.

सविस्तर माहिती :- संत साहित्याचे अभ्यासक स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचा जन्म प्रभू श्री वैद्यनाथाच्या कृपाशिर्वादाने पावन झालेल्या परळी तालुक्यातील नंदनज या गावी झाला. लहानपणापासूनच वैद्यकिय अधिकारी बनण्याच स्वप्न असलेल्या महाराजांनी महाविद्यालयीन शिक्षण जळगाव जिल्हयातील रावेर येथे पूर्ण केले आणी ’सीईटी’ च्या परीक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळवले. परंतु काही वैयक्तिक कारणास्तव  महाराजांनी आपल्या वैद्यकिय तज्ञ (डॉक्टर) होण्याच्या स्वप्नाकडे पाठ फिरवली. मग पुणे विद्यापीठातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन स्त्री “आदिशक्ती संत मुक्ताबाई” यांच्या जीवनावर संशोधनपर अभ्यासक्रम (पी.एच.डी.) पूर्ण केली आणि संत साहित्याचे अभ्यासक अशी ओळख समाजात निर्माण केली. स्वामीजींना ब्रम्हीभूत नाना महाराज साखरे पुरस्कार, श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार, गौरव महाराष्ट्र पुरस्कार, विशेष कार्य गौरव पुरस्कार, व पुणे येथील बालगंधर्व परिवाराच्या बालगंधर्व विशेष गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

 

ह.भ.प

तुकाराम गाथा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.