बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

बाई मी लिहिणें शिकलें – संत जनाबाई अभंग – ११४

बाई मी लिहिणें शिकलें – संत जनाबाई अभंग – ११४


बाई मी लिहिणें शिकलें सद्‌गुरायापासीं ॥ध्रु०॥
ब्रह्मीं झाला जो उल्लेख ।
तोचि नादाकार देख ।
पुढें ओंकाराची रेख ।
तूर्या ह्मणावें तिसी ॥१॥
माया महतत्त्वाचें सुभर ।
तीन पांचाचा प्रकार ।
पुढें पंचविसांचा भार ।
गणती केली छत्तीसीं ॥२॥
बारा सोळा एकविस हजार ।
आणीक सहाशांचा उबार ।
माप चाले सोहंकार ।
ओळखिले बावन्न मात्रेंसी ॥३॥
चार खोल्या चार घरीं ।
चौघे पुरुष चार नारी ।
ओळखुनी सर्वांशी अंतरीं ।
राहिले पांचव्यापासीं ॥४॥
पांच शहाणे पांच मूर्ख ।
पांच चाळक असती देख ।
पांच दरवडेखोर आणिक ।
ओळखिलें दोघांसी ॥५॥
एक बीजाचा अंकूर ।
होय वृक्षांशीं विस्तार ।
शाखापत्रें फळ फुलभार ।
बीजापोटीं सामावे ॥६॥
कांतीण तंतूशीं काढून ।
वरी क्रीडा करिती जाण ।
शेवटीं तंतूशीं गिळून ।
एकटी राहे आपैसी ॥७॥
वेदशास्त्र आणि पुराणा ।
याचा अर्थ आणितां मना ।
कनकीं नगाच्या भूषणा ।
अनुभव वाटे जीवासीं ॥८॥
नामदेवाच्या प्रतापांत ।
शिरीं विठोबाचा हात ।
जनी म्हणे केली मात ।
पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बाई मी लिहिणें शिकलें – संत जनाबाई अभंग – ११४

1 thought on “बाई मी लिहिणें शिकलें – संत जनाबाई अभंग – ११४”

  1. आहे माझ्याकडं या कूट अभंगांचा अर्थ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *