बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

पुण्यवंत पाताळ लोकीं – संत जनाबाई अभंग – २५९

पुण्यवंत पाताळ लोकीं – संत जनाबाई अभंग – २५९


पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि ।
कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी ।
चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली ।
वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली ।
यादववृंदा ही गोष्‍ट बरी नाहीं केली ॥३॥
सत्त्ववानाचा बहु केला छळ ।
कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
सखा म्हणविसी त्याचें नासी बळ ।
जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुण्यवंत पाताळ लोकीं – संत जनाबाई अभंग – २५९

2 thoughts on “पुण्यवंत पाताळ लोकीं – संत जनाबाई अभंग – २५९”

  1. जनाबाई साठी देव स्वतः काम करत असे एक दिवस काम झाल्यानंतर देव निघून गेले आणि त्यांचा शेला जनाबाईंच्या घरात राहिला आणि पुजाऱ्याने तो जनाबाईंनी चोराला म्हणून त्यांना शिक्षा म्हणून सुळावर द्यायचं ठरवलं …. सुळावर द्यायच्या आधी शेवटची इच्छा विचारली तर त्या म्हणाल्या मला महाद्वारमध्ये न्या….. आणि ती देवापुढे उभी राहून त्याला आपलं गाऱ्हाणं सांगत आहे चूक तू केली पण शिक्षा मला एवढं सांगूनही देव ऐकत नाही म्हणून जनाबाई देवाशी भांडण करणारा हा अभंग आणि तुझ्या दराबरामध्ये न्याय नाही असा सांगणार अभंग आहे यात अनेक उदाहरणं आहेत… पुण्यवंत पाताळ लोकी नेला म्हणजेच बळी. ..
    दरिद्री तो भाग्यवंत केला म्हणजेच सुदामा
    चोरट्याचा बहुमान वाढविला म्हणजेच वाल्या कोळी
    किर्तीवान म्हणजेच नल दमयंती…
    अशी बरीच उदाहरणे आहेत ह्या अभंगांमध्ये आहेत तात्पर्य जनाबाई संवाद पण देवासोबत करत आणि वाद पण देवसोबत घालत असे अशी ही देव भक्ताची अलोट आणि हे जनाबाईवर खोटं आळ आला त्या रागातून व्यक्त झालेल्या ओव्या आहेत
    धन्य ती नामयाचीदासी जनी आणि धन्य तो पांडुरंग?????????

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *