बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

खंडेराया तुज करितें – संत जनाबाई अभंग – २६३

खंडेराया तुज करितें – संत जनाबाई अभंग – २६३


खंडेराया तुज करितें नवसू ।
मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा ।
मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥
सासरा मेलिया होईल आनंद ।
मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥
नणंद सरतां होईन मोकळी ।
गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवघे मरुं दे ।
एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खंडेराया तुज करितें – संत जनाबाई अभंग – २६३

1 thought on “खंडेराया तुज करितें – संत जनाबाई अभंग – २६३”

  1. देविदास विश्वनाथ खताळे

    मी पणाची सासू मरू दे, म अहंकार नावाचा सासऱ्याच्या आसरा जाईन मग अहंकार नावाचं सासरा आपोआप मरेन, वासना नावाची नणंद मरूदे, मग शुद्ध अंतःकरनातं भक्तीची झोळी घेईन आणि मी भगवताच्या चारणावर एकटीच राहीन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *