संत जोगा परमानंद अभंग

वाचा लोधावली गुणा – संत जोगा परमानंद अभंग – ५

वाचा लोधावली गुणा – संत जोगा परमानंद अभंग – ५


“वाचा लोधावली गुणा।
स्वरुपी पाहिले लोचना॥
चरणी स्थिरावले मन।
जगजीवन देखिलिया॥
तो म्या देखिला देखिला।
विठ्ठल पंढरीचा राजा ॥
भानुबिंबे अति सुढाळ।
मन मंडित वःक्षस्थळा ॥
चरणी तेजाचे झळाळ।
मुगुटी किरणे फाकती ॥
ऐसा नयनी देखिला।
तो मज असुमाई झाला॥
जोगा विनवितो विठ्ठला।
वोसंडला आनंदु॥”


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाचा लोधावली गुणा – संत जोगा परमानंद अभंग – ५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *