संत कर्ममेळा अभंग

सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं – संत कर्ममेळा

सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं – संर्ममेळा


सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं ।
पूर्वीच निर्धारी बांधियेली ॥१॥
आतां का वाईट म्हणो कशासाठीं ।
आपुली ती राहाटी भोगूं आम्ही ॥२॥
तुम्ही तो व्यापक सर्वांसी निराळें ।
आमुची कर्मफळें भोगूं आम्ही ॥३॥
कर्ममेळा म्हणे वचन प्रमाण ।
आमुची निजखूण कळली आम्हां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं – संत कर्ममेळा

2 thoughts on “सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं – संत कर्ममेळा”

  1. अर्थ . संत चोखोबाऱ्या यांचे चिरंजीव संत कर्म मेळा महाराज सांगतात सुख दुःख दोन्ही आमच्या पदरी पुर्वीच बांधले आहे. एक वोवी।। जया जे कर्म सुञ मांडोनी ठेवीले स्वतंञ । तो त्या गतीपाञ होऊची लागे।। किंवा वाहिल्या उव्दोग दुःख ची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।। १।। आतां का वाईट म्हणो कशासाठी दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही।।आणिका रुसावे नलगे भहुता । आपुल्या संचिता वाचोनिया ।। २||देवा तुम्ही व्यापक आहात आमचे कर्म फळे भोगु आम्हि ||३||कर्म मेळा सांगतात आमचे वचन प्रमाण आहे आमची हे निजखुण कळली आम्हा ।।४||

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *