संत महात्मा बसवेश्वर

संत महात्मा बसवेश्वर माहिती

महात्मा बसवेश्वर महाराज (अन्य नावे: बसव,बसवण्णा, कन्नड: ಬಸವೇಶ್ವರ) (इ.स. ११०५ – इ.स. ११६५) हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातीलजातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.

शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते.  त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते. बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.

हे पण वाचा:- सर्व संतांची माहिती  वाचण्यासाठी इथं  क्लिक करा 

भारतीय लोकशाही संसदेची स्थापना

बसवण्णांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली.( बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक ,समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते.सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही म.बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचनसाहित्यातून दिसून येते.एकूणच त्यांनी वचनसाहित्यात समता,मूल्य,न्याय,बंधूता,एकात्मता तसेच स्वातंत्र्य,अधिकार ,नियंत्रण व शिस्त,सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहेत.सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता,हिंसा ,भेदभाव व जातीय राजकारण इ.समस्यावर(पायबंद) आळा घालता येईल.परिणामतः चांगले सुशासन व प्रशासन व्यवस्था निर्माण होइल.

बसवेश्वर यांचे कार्य

संत महात्मा बसवेश्वर

या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे
ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील
अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी “अनुभव मंडप’
ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास
कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद
होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.
प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये.

बसवेश्वर यांचे कार्य

भारतात प्राचीन काळापासून भगवान शिवाची उपासना होत आली आहे. नंदी हा भगवान शिवाचे वाहन आणि शिष्य. कृषिप्रधान भारतात वृषभ (बैल) हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वृषभाला नंदीच्या रूपात पूजण्याची प्रथाही भारतात प्राचीन काळापासून आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला गेला आहे. यादिवशी बैलांना शेतीकामाला जुंपण्यात येत नाही. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव ठेवून आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याची परंपरा भारतीयांच्या तरल संवेदनेची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. पशु-पक्षांचे शोषण होऊ नये यासाठी 21 व्या शतकातील मानव कायदे बनविताना दिसतो, परंतु भारतामध्ये प्राणिमात्रांवर दया करणेच नव्हे, तर ईश्वररूपात पाहणेदेखील दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग आहे. 900 वषार्र्ंपूर्वी समाजात समरसता निर्माण करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना साक्षात नंदीचा अवतार मानले गेले. संस्कृतमधील “वृषभ’ या शब्दाचे बसव हे कन्नड रूप. सन 1131 मध्ये बसवण्णांचा जन्म झाला. (बसवला लोक प्रेमाने बसवण्णा म्हणत) पुढे लोकांनी त्यांना आदराने “बसवेश्वर’ हे नामाभिधान दिले.

समुद्राला भरती येते, त्यानंतर ओहोटी येते. सूर्य मध्यावर येतो आणि नंतर मावळतोही. समाजाचेही तसेच असते. या भूमीने व्यास, कपिल, कनाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेते, चंद्रगुप्तांसारखे सम्राट निर्माण केले. समाज भरभराटीला आला आणि नंतरच्या काळात अधोगतीही झाली. निरर्थक अंगरूढींनी उच्छाद मांडला. स्पृश्य-अस्पृश्यता यांसारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या प्रथा बोकाळल्या. दुर्दैव असे की हे सारे धर्माची झूल पांघरून सुरू होते. अशावेळी बसवण्णा यांचा उदय झाला आहे.
आधुनिक सुधारणावाद्यांपेक्षा बसवण्णा वेगळे होते. 19 व्या शतकातील थोर सुधारक स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला, त्यांना अपयश मिळल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वत:च अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती.

धर्म

समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने, हे महात्मा बसवेश्वर जाणून होते. कृष्णा आणि मलापहारी नद्यांच्या संगम ठिकाणी असलेल्या गुरुकुलात ज्ञानी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते. विविध ग्रंथांचा, ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्त्वे कन्नडमधून लिहिली. बसवण्णांपूर्वी कन्नड वाङ्‌मय फक्त पद्यस्वरूपात लिहिले गेले होते. बसवण्णांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्‌मयाचा विकास झाला. कित्येक शिवशरणांनी म्हणजे शैवसंतांनी बसवण्णांचे अनुकरण केले. या वचनांचा लोकांमध्ये प्रचार झाला. वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजाची नैतिक व धार्मिकदृष्ट्या रचना कशी असावी, हे सांगण्यात आले. प्रत्येकाने आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करतानाच प्रामाणिक व आध्यात्मिक जीवन जगायला मार्गदर्शक ठरतील अशी तत्त्वे बसवेश्वरांनी समाजाला दिली.

कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यांतील लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ झालेली दिसतात.
बसवण्णांचे समाजपोषक विचार आणि आचार याने प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले. सर्वसामान्यांच्या उन्नतीची कामे करण्यात बसवण्णांचा हातखंडा होता. निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले. सत्ता आणि वैभव, कीर्ती पायाशी लोळण घेतानाही बसवण्णा आध्यात्मिक नीतिमूल्यांपासून ढळले नाहीत. या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी “अनुभव मंडप’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.

मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.

basveshwar-maharaj-marathipizza02

श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी (दासोह ) मांडल्यामुळे बसवेश्र्वरांची वृत्ती समाजवादी, समतावादी होती, असे दिसून येते. दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पूरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

बसवेश्र्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.
बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रीयांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.

तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला. तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.

असा आंतरजातीय विवाह तो ही १२ व्या शतकात हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी होतं कारण आजही म्हणजे ९०० वर्षांनंतरही आपल्या समाजाची असा विवाह स्वीकारण्याची पूर्ण मानसिकता झालेली नाही.

basveshwar-maharaj-marathipizza03

बसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. हे त्या काळातील पहिले लोकशाहीचे संसद होते. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. तत्कालीन शिवशरण-शरणींची अशी वचने पुढे संग्रहीत करण्यात आली. मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरूपी विचार पेरले.

 


महात्मा बसवेश्वर यांचे चातुर्वर्ण्य व कर्मकांड विषयक विचार

वर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात,
चांभार उत्तम तो दुर्वास
कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी
तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती
जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.

भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल,

मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे.

लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात.

जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,

दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे।
पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची।
पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे।
साधन पूजेचे काय सांगा ?

दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ?

अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे.

वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे.

आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे.

वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत.

वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे. 

बसवण्णा एका वचनात म्हणतात : –

दगडाचा देव देव नव्हे।
मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे।
सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा।
देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी।
हे कुडलसंगमदेवा।।

आज परिस्थिति अशी आहे की लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णांची शिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही.

लिंगायत हे पूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. लिंगायत राशीभविष्य पाहतात तेही ब्राह्मणाकडून; लग्नाचे मुहूर्त ब्राह्मणाकडून काढून घेतात; त्यांचे लग्न व अन्य धार्मिक संस्कार ब्राह्मणच करतात.

लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले.

लिंगायत हे कर्मकांड, देव, व्रतवैकल्य, भविष्यवाणी, यज्ञ, अंधश्रद्धा, आत्मा अशा चाकोरीत गुंतलेले आहेत.

त्यामुळे लोकांना वाटते की ते ब्राह्मण आहेत.

असाच प्रचार व प्रसार करून ब्राह्मणवादी लोक यशस्वी झाले आणि लिंगायतांना ब्राह्मणी धर्माच्या अधीन बनवले.

संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली.

त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य

ही थोतांडे नाकारली आणि ७७० परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली.


महात्मा बसवेश्वर महाराज समाधी 

 इ.स. 1167 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी ते संगमेश्वराशी एकरुप झाले.

कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधीस्थळ उभारले आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

source wikipedia

संत महात्मा बसवेश्वर । संत महात्मा बसवेश्वर । संत महात्मा बसवेश्वर । संत महात्मा बसवेश्वर

8 thoughts on “संत महात्मा बसवेश्वर माहिती”

 1. *”मराठीत व्यवस्थित भाषांतर करा.कांहीं ठिकाणीं शब्द ,अर्थ नीट जुळत नाही आपला प्रयत्न कौतुकास्पद आहे..डॉक्टर अशोक कामत यांच्यासारख्या साहित्यकाराकडून मराठीत भाषांतर करा .
  कन्नड चे थेट धेडगुजरी मराठी विजापूरी (bombay karnatak ?)भाषेत भाषांतर केल्यामुळे शुद्ध मराठी भाषिकांना नीट अर्थबोध होत नाही.लिहिण्यामागे आपल्या भावना व हेतू स्वच्छ आहेत.परंतु माहिती देताना शुद्ध मराठीत लिहिले तरच आपले कार्य सफल होईल.धन्यवाद..!”*

 2. Hanmant shivnappa Shanke

  या लेखामध्ये कांहि चुका आहेत कृपया त्यामध्ये बदल करावा.
  म.बसवण्णां हे विरशैव कुटुंबात नव्हे तर शैव कुटुंबामध्ये झाला.
  त्यांच्या वडिलांचे भादरस झाले आहे ते नाव मादरस आहे.
  आणि म.बसवण्णांनी बहिणीला मुंज नाकारल्यामुळे घर सोडले त्यांनी मला लिंगदिक्षा आधीच झाली आहे असे म्हणणे शक्यच नाही.
  कारण ते स्वत:च इष्टलिंगनिर्मापक आहेत.
  त्यांनीच इष्टलिंग संकल्पना अस्तित्वात आणली.त्याअगोदर इष्टलिंग धारण करणारे कोणिच नव्हते.
  कुडलसंगमक्षेत्री त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास करुन त्यातील त्रुटी जाणुन घेऊन त्यांना बदलणे शक्य नसल्याने एकदेवोपासनेचा अवलंब करत इष्टलिंगाचे निर्माण करुन लिंगायत धर्माची निर्मीती केली व त्याच्या प्रसार प्रचारार्थ नोकरीनिमीत्त मंगळवेढ्यापासुन सुरुवात केली.
  अनुभव मंटपाची स्थापना ही बसवकल्याण येथे केली गेली व त्या अनुभव मंटपाच्या प्रथम पिठाधीशस्थानी अल्लमप्रभुदेवांची निवड केली.
  म.बसवण्णांचा इतिहास हा नाजुक विषय आहे पुढिल पिढ्यांना चुकिची माहिती झाल्यास तोच इतिहास पुढे जाईल त्यामुळे कृपया वरील बाबींविषयी विचार करावा.
  शरणु शरणार्थी….??????
  हणमंत शिवणप्पा शंके आलुर ता.उमरगा जि.उस्मानाबाद.
  9552885730.

 3. सिद्धमल्लय्या हिरेमठ

  बसवण्णांच्या वडिलांचे नाव मादिराज उर्फ मादरस आणि आई मादलांबा .
  कुडलसंगम येथे जातवेद मुनि उर्फ ईशान्य गुरु हे बसवण्णांचे दीक्षा व शिक्षा गुरू होते.
  वीरशैव हा वर्णाश्रम विरोधी धर्म आहे.
  वीरशैव हे अत्याश्रमी होत, वर्णाश्रमाच्या अतित आहेत.

 4. सिद्धमल्लय्या हिरेमठ

  सद्गुरु कडून दीक्षा संस्काराने जे लिंग दिले जाते ते इष्टलिंग होय. ते इष्ट सिद्धी प्रदायक असते.
  असे इष्टलिंग धारण करण्याची प्रथा ही सिंधू संस्कृती काळातही अस्तित्वात होती हे सिंधू नदी खोऱ्यातील उत्खननातून स्पष्ट झाली आहे.

 5. Dinesh Dattatray Satpute

  Great Indian Saint who attempted to unroot Caste System in Indian Society.I humbly salute to Basveshwar

 6. खूपच छान माहिती दिली सर.
  आभारी आहे..????????
  समाजात, समता, बंधुता,मूल्य, न्याय,एकात्मता, मूल्य,अधिकार,शिस्त, सुशासन,नियंत्रण आणि प्रशासन या बाबींवर तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक,मौर्य शासक, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवजी महाराज महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ई. अनेक महापुरुष या सर्व महत्वाकांक्षी,विज्ञानवादी, विवेकवादी, तर्क, ज्वलंत वैचारिक समाजसुधारक, महापुरषयाचे या बाबी वर कार्य व योगदान आहे. या साऱ्या महापुरषयांना कोणी विसरता कामा नये…
  साध्य समाजात जागरूकता पसरवने विचारतून महत्वाचे वाटते..
  सध्या देशयातिल युवक गरीबी-दारिद्र्य,जाति-धर्म,उच्च-निच्च, श्रद्धा-अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढ़ि-परंपरा, या सरयाना सामोर जाऊंन यांचा कट्टर वादी होऊन सामाजिक पिड्या नास्वत आहेत, हे कूट तरी थंबल पाहिजे…

  #जयभारत..✊????

 7. खूपच छान माहिती दिली सर.
  आभारी आहे..
  समाजात, समता, बंधुता,मूल्य, न्याय,एकात्मता, मूल्य,अधिकार,शिस्त, सुशासन,नियंत्रण आणि प्रशासन या बाबींवर तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक,मौर्य शासक, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवजी महाराज महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ई. अनेक महापुरुष या सर्व महत्वाकांक्षी,विज्ञानवादी, विवेकवादी, तर्क, ज्वलंत वैचारिक समाजसुधारक, महापुरषयाचे या बाबी वर कार्य व योगदान आहे. या साऱ्या महापुरषयांना कोणी विसरता कामा नये…
  सद्या देश्यतील युवक मधे वैचारिक जागरूकता पसरवने महत्वाचे वाटते..
  सध्या देशयातिल युवक गरीबी-दारिद्र्य,जाति-धर्म,उच्च-निच्च, श्रद्धा-अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढ़ि-परंपरा, या सरयाना सामोर जाऊंन यांचा कट्टर वादी होऊन सामाजिक पिड्या नास्वत आहेत, हे कूट तरी थंबल पाहिजे…

  #जयभारत..✊

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *