संत कबीर

संत कबीर दास माहिती

उपनाम: कबीरदास
जन्म: विक्रमी संवत १४५५ (सन १३९८ ई ० )
वाराणसी, (हाल में उत्तर प्रदेश, भारत)
मृत्यु: विक्रमी संवत १५५१ (सन १४९४ ई ० )
मगहर, (हाल में उत्तर प्रदेश, भारत)
कार्यक्षेत्र: कवि, भक्त, सूत कातकर कपड़ा बनाना
राष्ट्रीयता: हिंदु
भाषा: हिन्दी
काल: भक्ति काल
विधा: कविता
विषय: सामाजिक, आध्यात्मिक
साहित्यिक
आन्दोलन:
भक्ति आंदोलन
प्रमुख कृति(याँ): बीजक “साखी ,सबद, रमैनी”
प्रभाव: सिद्ध, गोरखनाथ, रामानंद[1]
इनसे प्रभावित: दादू, नानक, पीपा, हजारी प्रसाद द्विवेदी

 

संत कबीरदास जन्म

जन्म : १४४० (प्रतापघर)
मृत्यू  : १५१८ (मघर)

कशी शेत्रात राहणाऱ्या एका मुसलमानाच्या जोडप्यास समुद्राच्या लाटांवर मिळालेल्या पेटीत सापडलेले मुल म्हणजे संत कबीरदास. निरुच निमा या जोडप्यास एकही मुल नव्हते. म्हणून त्यांनीच त्याचा सांभाळ केला. पुढे कबीरदास मोठा झाल्यावर विणकाम करू लागला. काम करीत असताना तो देवाची भक्ती करीत असे, भजने,दोहे गात असे. देवावर त्याची गाढ श्रद्धा होती. एकदा त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळेना, त्यावेळी एक भिकारी त्याकला वस्त्र नसल्यामुळे शालू मागत होता. कबीरांनी विणलेला शालू जो बाजारात विकायला न्यायचा होता तो शालू भिकाऱ्याला देऊन टाकला. कबिरांना गुरु कोणाला म्हणावे ते समजत नव्हते. नंतर ते काशी मध्ये आलेल्या साधू रामानंद यांचे शिष्य बनले.

पुढे ते रामानदाच्या संगतीत राहिले. मुसलमान व हिंदुना राम व रहिम ऐक्याची भावना प्रकट केली व उपदेश करीत करीत ते भारतभर फिरले. त्यांचे दोहे अतिशय उच्च प्रतीचे होते. समाजाला समजेल अशा शब्दात त्यांनी उपदेश केला. देवाची आराधना आपल्या मार्गाने दुसऱ्याला त्रास न देत करावी, देव एकाच आहे असे ते सांगत. त्यांच्या एका डोहात म्हटले आहे कि, “सहज मिले ओ पाणी है भाई, मागनेसे मिले ओ दुध है, खीच के ले तो खून है ” अशा परखड शब्दात आपला उपदेश त्यांनी जनतेला दिला.

संत कबीरदास जीवन

संत कबीर - sant kabirभारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता, याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते.

कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप विठ्ठलाची लेकरे आहेत.संत रविदास कबिरांना मोठा भाऊ मानत असत

संदर्भ

उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणजे संत कबीर . संत कबीर यांच्या जन्म वर्षाबद्दल विवाद आहेत. कोणी ते इ.स. १३७० मध्ये तर कोणी १३७८ मध्ये जन्मले असे म्हणतात.

त्यांच्या जन्माविषयी परंपरागत कथा सांगितली जाते ती अशी –

ज्येष्ठ पौर्णिमेस एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्मला पण उजळ माथ्याने त्याचे पालनपोषण करणे शक्य नाही म्हणून तिने काशीतील एका सरोवराच्या ( लहरतारा ) काठी त्याला टाकून दिले. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एका मुस्लिम जोडप्याला तो सापडतो.  त्या मुस्लिम जोडप्यांचे नाव निरू व निमा असते. ते त्या मुलाचे चांगले पालनपोषण करतात आणि पुढे हाच मुलगा कबीर या नावाने प्रसिद्ध झाला.

कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्या बद्दलची कोणतीही ठाम महिती नाही पण असे म्हणतात कि त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा  आणि कमाली नावाची एक मुलगी होती.

कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिला पण त्याचा मृत्यू काशीत नसून मगहर येथे झाला, हे स्वतःच त्यांनी सांगितले आहे.

“सकल जनम शिवपुरी गंवाया।

मरती बार मगहर उठि आया।”

कबीर १५ व्या शतकातील संत होते. त्यांनी तत्कालीन रूढींवर प्रहार केले. निर्भीडता हे त्यांच्या ओव्यांचे मुख्य वैशिष्ट्य.

तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. या माध्यमातूनच त्यांनी समाजाला थोतांड आणि अवडंबरातून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओव्या (दोहे) आजही आपल्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.

कबीर आप ठगाइये और न ठगिये कोय।
आप ठग्या सुख उपजै और ठग्या दु:ख होय।।
चोरी, लबाडीपासून दूर राहण्याचा उपदेश करताना संत कबीर सांगतात की, दुस-याला लुटण्यापेक्षा स्वत: लुटले गेलेले बरे. कारण दुस-याला लुटले तर नक्कीच त्याचे रूपांतर दु:खात होणार।  संत कबीर मराठी-माहिती sant kabir information in marathi  


संत कबीर दोहे

सिंहों के लेहड नाही, हंसों की नहीं पाँत।
लालों की नहीं बोरियां, साध न चलै जमात।।

ते सांगतात, सिंह जंगलात एकटाच असतो. सिंहांचे कळप नसतात. तसेच हंसाचे थवे नसतात आणि रत्नांची पोती नसतात. याच प्रकारे संतसुद्धा जाती-जमाती घेऊन चालत नाही. तो एकटाच जगकल्याणासाठी झटत असतो.

कबीर घास नींदिये, जो पाऊँ तलि होइ।
उडि पडै जब आँख में, बरी दुहेली होइ।।

कबीर या दोह्यात म्हणतात, कुणालाही छोटे लेखू नये। पायाखालचे गवतही जेव्हा डोळ्यात पडते तेव्हा खूप त्रास होतो।

साई इतना दीजिये, जामै कुुटुंब समाय।
मैं भी भूखा ना रहूं, साधु न भूखा जाय।।
या ओवीत कबीर थोड्यामध्ये सुखी राहण्याचा उपदेश देतातत. हे ईश्वरा मला इतकेच दे की ज्याने माझ्या कुटुंबाला पुरेसे असेल आणि कधी कुणी पाहुणा घरात आला तर त्याचे अगत्य करता यावे.

हीरा तहां न खोलिये, जहँ खोटी है हाटि।
कसकरि बांधो गठरी, उठि करि चलै बाटि।।

या दोह्यात योग्य जागेवर ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. ज्ञान हे हि-यासारखे असते. जिथे प्रामाणिक लोक नसतील तिथे हि-याची थैली उघडूच नये. उलट तिला आणखी घट्ट बांधून लवकरच त्या जागेवरून चालते व्हावे.

सब काहू का लीजिए, सांचा सबद निहार।
पच्छपात ना कीजिये, या कहे कबीर विचार।।

सत्याची महती या दोह्यातून कबीर सांगतात, सत्य कुठेही मिळाले तर ते निसंकोच भावाने ग्रहण करा. सत्याचा स्वीकार करताना भेदाभेदाचा विचार मनात येऊ देऊ नका. विचार करायची गरज नाही. अत्यंत विचारपूर्वक हा संदेश त्यांनी दिला आहे.

संत कबीर मृत्यू

त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते. मगहर मध्येच मुस्लिम प्रथेनुसार त्यांचे दफन झाले असावे.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

sant kabir das । sant kabir dohe । sant kabir vani । sant kabir ke dohe । संत कबीर – sant kabir । कबीर के दोहे । कबीर साहेब की आरती । कबीर दोहा

2 thoughts on “संत कबीर दास माहिती”

  1. कबीर साहेबांचा जन्म व मृत्यु झाला नाही, लहरतारा तलावात ते प्रकट झाले, साक्ष अष्टानंद ऋषि आहेत व मगहर येथुन सशरीर सतलोक गमन झाले

  2. संंत कबीर हे पूर्ण परमात्मा आहेत. ते अविनाशी असून त्यांना जन्म मृत्यू नाही. ते चारी युगात या ब्रम्हांडात येवून लिला करून सदेह येतात व सदेह सतलोकात जातात. संत ज्ञानेश्वर महाराज यानी देखिल संत कबीर हेच पूर्ण परमात्मा असल्याची ग्वाही दिली आहे. संत नामदेव महाराज याना संत कबीर यानी नाम दिक्षा देवून त्याना मोक्ष प्रदान केला आहे असे कबीर सागर (संत धर्मदास लिखीत) मध्ये लिहीले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *