संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा माहिती

संत गाडगेबाबा – जन्म तारीख फेब्रुवारी २३, इ.स. १८७६, फेब्रुवारी १३, इ.स. १८७६
महाराष्ट्र
मृत्यू तारीख डिसेंबर २०, इ.स. १९५६
अमरावती
नागरिकत्व
  • भारतीय व्यक्ती
व्यवसाय
  • सामाजिक कार्य 
मातृभाषा
  • मराठी भाषा


संत गाडगेबाबा – बालपण

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले.

त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा.

ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले.


संत गाडगेबाबा – गाडगे महाराज

गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी परिट होते.


संत गाडगेबाबा विषयी 

अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका.गोधडेबुवा, चिंधे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिध्द. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतद्या यावर भर. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे. गादी वा मठ न स्थापणे.

संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. मागील संतानी जो मार्ग दाखविला, त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले, समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली.


संत गाडगेबाबा समाजसेवक व क्रांतिकार

गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची राहण्याची सोय केली.  समाजप्रबोधनाबरोबरच त्यांची नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक ‘वास्तुनिर्मितीकार’ म्हणून नवी ओळख करून देणारा लेख-

म हाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले. संत गाडगेबाबा हे त्यापकी एक. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत- ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन  ‘स्वच्छते’चा  महामंत्र संपूर्ण देशाला दिला.

विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना अस्वछता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे प्रथम झाडू मागवून घेत आणि गाडगेबाबा व त्यांचे अनुयायी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करीत. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य-शासनाला घ्यावी लागली.  त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’  राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे.

आपल्या संपूर्ण जीवनात तत्कालीन धर्ममरतडांकडून हेटाळणी व अपमान सहन केले. भोवतालच्या समाजासाठी आध्यात्मिक कीर्तनातून ज्ञानगंगा गावोगावी पोहोचविणारे संत गाडगेबाबा ही एक बाजू आत्तापर्यंत आपल्या सर्वाना माहीत आहे. परंतु नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक  ‘वास्तुनिर्मितीकार संत गाडगेबाबा’ यांची ही अज्ञात बाजू जाणून घेऊ.

हल्लीच्या युगात, गावोगावी व शहरातून ठिकठिकाणी, विशेषकरून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. परंतु गाडगेबाबांनी तसे न करता राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते


संत गाडगेबाबा – कार्य

१९०८ : मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.

१९२५ : मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.

१९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले. मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही“ असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

फेब्रुवारी ८,इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन‘ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.

१९३२ : ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘

१९३१ : वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४ : जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली. गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करुन दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.


गाडगे महाराज यांची एक सुंदर कविता 

‘काय करून ऱ्हायला रे ?’
‘न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !’
‘अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?’
‘देवाचच लेकरू हाय !’
‘आन तूह लेकरू ?’
‘माह व्ह्य ना जी !’
‘आन तू कोनाचा रे ?’
‘मी माह्या बापाचा न जी !’
‘म्हन्जे शेवटी कोनाचा ?
‘देवाचं लेकरू !’
‘मंग तूह लेकरू बी देवाचच न ?
‘हो जी !’

अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू . आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे.


पुरस्कार

गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.


मृत्यू 

२० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.


संत गाडगे बाबा जीवन चरित्र


wikipedia.org

शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

sant gadgebaba । संत गाडगेबाबा । संत गाडगेबाबा – sant gadgebaba

2 thoughts on “संत गाडगेबाबा माहिती”

  1. अशोक दत्तात्रेय पत्की,अंबाजोगाई, जि. बीड.

    संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याविषयी संक्षिप्त परंतु उत्तम माहिती
    बाबांचे ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, आश्रम शाळा, जलाशय संरक्षण आणि शाळा-महाविद्यालय निर्मिती तून शिक्षणाविषयीची तळमळ हे कार्य महाराष्ट्रासाठी व संपूर्ण देशासाठी दिपस्तंभासारखे दिशादर्शक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *