संत नरहरी सोनार अभंग

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर – संत नरहरी सोनार अभंग

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर – संत नरहरी सोनार अभंग


काय तुझी थोरी वर्णूं मी पामर ।
होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥
तुजसरशी दया नाहीं आणिकासी ।
असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ ॥
जन हो जोडी करा नाम कंठीं धरा ।
जेणें चुके फेरा गर्भवासी ॥ ३
नरदेही साधन समता भावभक्ति ।
निजध्यास चित्तीं संतसेवा ॥ ४ ॥
गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे ।
नरहरी राहे एकचित्तें ॥ ५ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *