संत निळोबाराय अभंग

देवाचें वर्म सांपडला भाव – संत निळोबाराय अभंग – १३२५

देवाचें वर्म सांपडला भाव – संत निळोबाराय अभंग – १३२५

देवाचें वर्म सांपडला भाव ।
नवजाये जवळुनी आडकला देव ॥१॥
देव म्हणे माझी नव्हेचि सुटका ।
भावेंविण म्हणती देवोचि लाटिका ॥२॥
वर्म हें यासीं दाविलें कोणें ।
संतांसी ठाउकें येर कोणीही नेणे ॥३॥
निळा म्हणे भक्तासी तिहींचि दाविलें ।
न सोडिती आतां जिवेंसी बांधलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देवाचें वर्म सांपडला भाव – संत निळोबाराय अभंग – १३२५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *