संत निळोबाराय अभंग

त्रास उपजे माझिया मना – संत निळोबाराय अभंग – १४३३

त्रास उपजे माझिया मना – संत निळोबाराय अभंग – १४३३

त्रास उपजे माझिया मना ।
अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥
जे या दुषिती नामासी ।
कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥
सांगती पाखंड ।
बोल बोलोनियां वितंड ॥३॥
निळा म्हणे जाती ।
घेउनी नरका शिष्यांप्रती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

त्रास उपजे माझिया मना – संत निळोबाराय अभंग – १४३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *