संत निळोबाराय अभंग

काय करुं वो भुलविलें – संत निळोबाराय अभंग – २१२

काय करुं वो भुलविलें – संत निळोबाराय अभंग – २१२


काय करुं वो भुलविलें भुलीं ।
चित्त माझें या विषयाचे चाली ।
आड कल्पना ठोकोनि राहिली ।
त्याणें संगती वो याची अंतरली वो ॥१॥
पायां पडतें वो दाखवा मज वाट कर्माकर्मा चुकूनियां घाट ।
कामक्रोधाचें ऐकोनि बोभाट ।
भय वाटे तें हें देखोनि दुर्घट वो ॥२॥
मज तो विचार न सुचे आपुल्या मतें ।
न्याल तुम्ही त्या येईन सुपंथें ।
घेउनी धर्म मज पाववा वो तेथें ।
जेथें असती सांवळे गोपिनाथ वो ॥३॥
कोठें गेले या करुं वोरबारा ।
आगी लागो या अघोरा संसारा ।
पडते गुंति हा अधिक्ची पसारा ।
भेटवा आतां मज न्यावो सारंगधरा वो ॥४॥
येथें होती हे बहुतचि उत्पात ।
जन्म जरा या व्याधींचे आघात ।
भुलले वाट वो न मिळतां संघात ।
तुम्ही पाववा वो रमानाथ जेथें वो ॥५॥
आहे भरवसा हा तुमचाचि मज ।
संत जाणतसां अंतरींचें गुज ।
आले शरण ते पावविता सहज ।
निळा म्हणे आतां राखा माझी लाज वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काय करुं वो भुलविलें – संत निळोबाराय अभंग – २१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *