संत निळोबाराय अभंग

खेळी खेळता वो – संत निळोबाराय अभंग – २१३

खेळी खेळता वो – संत निळोबाराय अभंग – २१३


खेळी खेळता वो विकळ सुंदरा ।
जालि आठविता नंदाच्या कुमारां ।
स्वेद कंपखेद दाटला शरिरा ।
जाला विरह तो नेणती इतरा वो ॥१॥
धरा आवरुनी म्हणति वो साजणी ।
धीर न धरत पडिलि धरणी ।
येकी सांगति वो जालि झाडपणी ।
वेगीं आणा आतां पंचाक्षरी गुणीवो ॥२॥
जातो प्राण वो येताति लहरे ।
येकी म्हणति वो डंखिली विखारें ।
आंग तापलें वो येतु आसे शियारे ।
येकि म्हणति वो मोडसियेचा भरें वो ॥३॥
येकि म्हणति गे लागलें दैवत ।
कुळिचें दारुण वो नेदि करु मात ।
घाला गोंधळ वो विनवा समस्त ।
ठेवा आण भाक करुनि येकचित्त वो ॥४॥
ऐसा मिळाला वो भेंवताला पाळा ।
होती चुकुर येकी रडताती बाळा ।
पाजा वोखदें वो वांचवा वेल्हाळा
नका उशिर गे धांवा उतावेळा वो ॥५॥
मग ते येकांतिची सांगे सखियासी ।
नका बाहेरि वो फुटो कोणापाशीं ।
आणा नंदाचा नंदनु येकांतासी ।
‍निळया स्वामीची हे भावना निश्चयेसी वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खेळी खेळता वो – संत निळोबाराय अभंग – २१३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *