संत निळोबाराय अभंग

झाला विरह अंतरी – संत निळोबाराय अभंग – २१४

झाला विरह अंतरी – संत निळोबाराय अभंग – २१४


झाला विरह अंतरी कामिनीसी ।
न ये सांगतां बोलतां कोणापासी ।
मुख सुकलें वो तापली विशेषी ।
आंग कापे तेणें झाली कासाविसी वो ॥१॥
हदई आठवे रीरंगसावळा ।
मनचि गुंतलें तयापासिं डोळा ।
कोण आणिल वो तया याचि वेळा ।
दयावया आलिंगन जिव उतावेळा वो ॥२॥
कोठें न गमे वो नावडे आणिक ।
जिविं जिवामाजि पडियलें ठक ।
उघडे नयन वो लागलि टकमक ।
कोण आणिल तो हरिल माझे दु:ख वो ॥३॥
जालि अवस्था ते नकळे कोणासी ।
जातां सांगो होईल हांसे पिसुणासी ।
होईल लाज वो कारण उपहासासी ।
कांहिंची न सुचे मी काय करुं यासी वो ॥४॥
कोण जिवलग वो येईल धांवती ।
माझें जिविचें आर्त उगविल निगुती ।
नेदितां कळो कोण आणिल श्रीपति ।
संग त्याचा माझा करिल एकांति वो ॥५॥
ऐसि विरहानळें पिडियलि बाळा ।
ह्रदयीं आठविते हरि वेळोवेळा ।
जाणोनी अंतरीं तो कृपेचा कोवळा ।
येउनि निवविले तिये म्हणे निळा वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

झाला विरह अंतरी – संत निळोबाराय अभंग – २१४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *