संत निळोबाराय अभंग

होतें लेउनियां आतींचे – संत निळोबाराय अभंग – २१५

होतें लेउनियां आतींचे – संत निळोबाराय अभंग – २१५


होतें लेउनियां आतींचे अंजन ।
तेणें देखिलें वो निक्षेपीचें धन ।
होतें वेदरायें ठेविलें जोडून ।
तेंचि सांपडलें आईतें निधान वों ॥१॥
जनीं जनार्दन प्रत्यक्षचि होता ।
तोचि मुसावोनि कृष्ण झाला आतां ।
मंडित चतुर्भज वेणुवाजविता ।
मुकुट कुंडले वो माळाचा मिरवता वो ॥२॥
प्रगट असोनियां न दिसेचि कोणा ।
आड आलिया वो बुध्दीचीं कल्पना ।
जाय हरपोनी अविदयेच्या भावना ।
तेणेंचि न देखती भूतीं भगवाना वो ॥३॥
कैसा मायामोह भ्रम झाला गाढा ।
तेणें जाणीवची धावें पुढा पुढा ।
विधिनिषेधाचा माझारी झगडा ।
तेणें अंतरला न सांपडे मूढा वो ॥४॥
इंद्रियां विषयाची सदा लगबग ।
मातले अहंकार काम क्रोध मांग ।
मदमत्सराचे धांवती निलाग ।
तेणें हातींच्या हातीं अंतरला श्रीरंग वो ॥५॥
ऐसें चुकवुनी आघात अपार ।
आजी सांपडले आईते भांडार ।
तेणें झालिये वो निजसुखें निर्भर ।
निळा म्हणे भोगुं सुखाचे संभार वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

होतें लेउनियां आतींचे – संत निळोबाराय अभंग – २१५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *