संत निळोबाराय अभंग

राहो ध्यानीं मनीं हेंचि – संत निळोबाराय अभंग – २९०

राहो ध्यानीं मनीं हेंचि – संत निळोबाराय अभंग – २९०

राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रुपडें ।
जे कां वाडेंकोडे आलें पुंडलिका भेटी ॥१॥
ठेवूनियां विटे दोन्ही चरण सुकुमार ।
विराजले कर सुंदर कटिप्रदेशीं ॥२॥
ज्यातें चिंतिताती योगी मुनिजन मानसीं ।
संत ज्यातें भजती नित्य कीर्तनआवेशीं ॥३॥
निळा म्हणे त्याविण दुजें नलगे मज कांहीं ।
जाणे अंतरीचें पांडुरंग सकळही ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

राहो ध्यानीं मनीं हेंचि – संत निळोबाराय अभंग – २९०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *