संत निळोबाराय अभंग

धिक् त्याचें जन्मांतर – संत निळोबाराय अभंग – ३४४

धिक् त्याचें जन्मांतर – संत निळोबाराय अभंग – ३४४

धिक् त्याचें जन्मांतर ।
न देखे पंढरपुर महापापी ॥१॥
अहारे कर्मा बलवत्तरा ।
नेला अघोर भोगावया ॥२॥
नेदीचि उपजों विश्वास मनीं ।
पंढरी हे नयनीं देखावया ॥३॥
निळा म्हणे संग्रह होतां ।
पापाचा आईता उघडता तो ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धिक् त्याचें जन्मांतर – संत निळोबाराय अभंग – ३४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *