संत निळोबाराय अभंग

तुम्ही देवा प्रत्यक्ष असा – संत निळोबाराय अभंग – ६१३

तुम्ही देवा प्रत्यक्ष असा – संत निळोबाराय अभंग – ६१३

तुम्ही देवा प्रत्यक्ष असा ।
परि मी कैसा ओळखों ॥१॥
जेव्हां प्रगटोनि भेटी दयाल ।
तेव्हांचि फावाल सुरवाडें ॥२॥
निर्धना निक्षेप असोनि धन ।
जेंवि तें न देखोन दैन्य भाकी ॥३॥
निळा म्हणे झाली परी ।
तैसीच मज हरि नेणतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुम्ही देवा प्रत्यक्ष असा – संत निळोबाराय अभंग – ६१३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *