संत निळोबाराय अभंग

न धरे धीर धरितां मनीं – संत निळोबाराय अभंग – ७१८

न धरे धीर धरितां मनीं – संत निळोबाराय अभंग – ७१८

न धरे धीर धरितां मनीं ।
न संटे वदनीं गुणनाम ॥१॥
आटाहास्यें गर्जना करि ।
खवळली वैखरी नाटोपे ॥२॥
चरित्राचें उठती भार ।
जीव्हे अक्षर न संडे ॥३॥
निळा म्हणे लाविला चाळा ।
न कळे कळा हे तुमची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न धरे धीर धरितां मनीं – संत निळोबाराय अभंग – ७१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *