संत निळोबाराय अभंग

विदयामानें गर्वताठा – संत निळोबाराय अभंग – ८८५

विदयामानें गर्वताठा – संत निळोबाराय अभंग – ८८५

विदयामानें गर्वताठा ।
धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥
नेणती जेणें देव हातीं ।
लागे ते युक्ति हारविली ॥२॥
काम्यनिषिध्दीं आदर थोर ।
जप ते अघोर मंत्रांचे ॥३॥
निळा म्हणे यातना थोरी ।
नकीं अघोरी पडावया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विदयामानें गर्वताठा – संत निळोबाराय अभंग – ८८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *