संत निळोबाराय अभंग

अवघें देखे ब्रम्हरुप – संत निळोबाराय अभंग – 1555

अवघें देखे ब्रम्हरुप । गुण दोष पाप नातळे ॥१॥

त्याची झाली चित्तशुध्दी । कृपानिधी तोषला ॥२॥

हरीच्या भजनीं अत्यादर । पडेल विसर संसारें ॥३॥

निळा म्हणे विठ्ठल ध्यानीं । चित्तीं मनीं बैसला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *